गणेश भोळे
बार्शीत 65 हजार रुपरांची घरफोडी
बार्शी:
शहरातील विस्तारीत भागामध्ये असणार्या रिंगरुट रेथील वायकर प्लॉटमध्रे राहत असलेल्या खाजगी नोकरदाराच्या घराच्या पाठीमागील दरवाज्याचा कडीकोरयडा तोडून घरात प्रवेश करुन घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 65 हजार रुपरांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.

याबाबत खाजगी नोकरदार किरण भगवान शुक्ला रांनी बार्शी शहर पोलिसांत फियाद दिली आहे. शुक्ला हे छाया इंडस्ट्रीज या कंपनीत खाजगी नोकरी करतात. शुक्ला हे बुधवारी रात्री तुळजापूर रेथे देवी दर्शनाकरिता गेले होते. त्याची पत्नी व मुलगा, मुलगी, मेव्हणी जेवणखान झाल्यावर झोपले. झोपतेवेळी पत्नीने गळ्रातील गंठण, वेल, फुल, पैंजण असे काढून किचनमधील फ्रीजमधील ग्लासमध्ये ठेवले. सकाळी 7 वा. उठल्यावर त्रांचा मुलगा किचन रुममध्ये जाण्याकरिता चालला असता रुमला आतून कडी लावल्याचे दिसून आले. मुलाने ही बाब वडिलांना फोन करुन सांगितली. पाठीमागे जावून पाहिले असता त्याना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी त्याना चोरी झाल्याचे लक्षात आले.
चोरीस गेलेल्या दागिन्यामध्ये 10 ग्रॅम सोन्याचे गंठण, 10 ग्रॅम कानातील दोन वेल व फुले, 3 भार वजनाचा चांदीचा गणपती, 2 भार वजनाची चांदीची महालक्ष्मीची मूर्ती व 1,200 ची रोकड याचा समावेश आहे.
याबाबत पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहा. फौजदार वरपे हे करीत आहेत.