बार्शीत राज-विजय क्रीडा मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमीत्त भव्य रॅली 

  0
  271

  बार्शीत राज-विजय क्रीडा मंडळाच्यावतीने शिवजयंतीनिमीत्त भव्य रॅली 

   बार्शी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त येथील राज-विजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक विजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी शिवप्रेमींनी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

   रॅली समारोपाप्रसंगी शिवाजी महाविदयालयासमोरील छत्रपतींच्या पुतळयास आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, रमेश पाटील, पं.स.सभापती अनिल डिसले, नगरसेवक प्रशांत कथले आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी छत्रपतींच्या पुतळयावर गुलाबपुष्पांची उधळण करण्यात आली.   

  प्रारंभी भगवंत मैदान येथून पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्वर भोरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, अरुण बारबोले, सुधीर बारबोले, नगरसेवक विजय राऊत, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, चंद्रकांत पवार, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, युवा नेते अभिजीत राऊत, महावीर कदम, व्यापारी सचिन मडके, प्रशांत खराडे ,आदी उपस्थित होते. 

  रॅलीमध्ये सुरूवातीला युवती व महिला त्यापाठोपाठ युवक वर्ग मोठया प्रमाणावर मोटारसायकलसह सहभागी झाले होते. अनेकांनी आकर्षक असा पेहराव केला होता. युवकांसह, महिला व युवतीही भगवा फेटा घालून रॅलीत सहभागी झाल्या होत्या. शहरातील महाद्वार चौक, वीर सावरकर चौक, पटेल चौक, बुरूड गल्ली भोसले चौक, शिवाजी आखाडा, जुने पोलीस स्टेशन, पांडे चौक, कचेरी रोड मार्गे रॅली छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळयाजवळ पोहोचली. यावेळी चौकाचौकातील छत्रपतींच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

  रॅलीसमारोपाप्रसंगी छत्रपतींच्या व कर्मवीर जगदाळे मामा यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे संचालक वासुदेव गायकवाड, बाबा गायकवाड, मर्चंट असोचे अध्यक्ष दामोदर काळदाते, पं.स.माजी उपसभापती अविनाश मांजरे, बाबासाहेब कापसे, नगरसेवक दिपक राऊत, मदन गव्हाणे, काका फुरडे, महेश जगताप, संदेश काकडे, सतीश आरगडे आदी उपस्थित होते. 

  शिवशाही परिवाराच्यावतीने रॅलीचे स्वागत 

  शिवाजीनगर येथील शिवशाही परिवाराच्यावतीने रॅलीचे तसेच छत्रपतींना अभिवादनासाठी आलेल्या सर्वच शिवप्रेमींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. मान्यवरांचा यावेळी शिवशाही परिवाराच्या वतीने मानाचा फेटा बांधून आदर सत्कार करण्यात आला.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur