बार्शीत राजविजय क्रीडा मंडळाची भव्य मिरवणुक ,डिजेच्या तालावर तरुणाई थिरकली

  0
  219

  बार्शीत राजविजय क्रीडा मंडळाची भव्य मिरवणुक ,डिजेच्या
  तालावर तरुणाई थिरकली

  तालुक्यातील विविध गावचे घोडे पुण्याचे ढोल व राज्यातील
  नामांकित बँण्डपथके ठरली मिरवणुकीचे आकर्षण

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  बार्शी: येथील राजविजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने
  शिवजयंतीच्या निमीत्ताने राज्यासह पराज्यातील ढोल व बँण्ड पथके,मर्दानी खेळाची ्रप्रात्यक्षिके, नाचनारे मानवी मोर व घोडे यासह बार्शी तालुक्यातील विविध गावच्या घोड्यांचा सहभाग असलेली भव्य मिरवणुक काढण्यात आली़ या मिरवणुकीमध्ये डि़जे़च्या तालावर तरुणाई अक्षरशा थिरकली.

  माजी आ़ राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजविजय क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे नेतृत्व हे नगरसेवक विजय राऊत हे करतात़ २००४ साली स्थापन करण्यात आलल्या या मंडळाच्या वतीने राऊत चाळीत शिवरायांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे़.

  दि़२२ रोजी दुपारी दोन वाजता डॉ.बी वाय.यादव यांच्या हस्ते या मिरवुणकीचा शुभारंभ करण्यात आला़ यावेळी आ राजेंद्र राऊत, सोजर उद्योग समुहाचे प्रमुख अरुण बारबोले,नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, पं़स़चे सभापती अनिल डिसले, उपसभापती प्रमोद वाघमोडे,तहसीलदार प्रदीप शेलार, पोलिस निरीक्षक संतोष गिरीसोगावी, संतोष निंबाळकर, जि़प़ सदस्य किरण/मोरे, मदन दराडे, शिवशक्ती बँकेचे अध्यक्ष डॉ़ प्रकाश बुरगुटे, बाळासाहेब गव्हाणे, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले,उपसभापती झुंबर जाधव, गटनेते दिपक राऊत, पट्टम पवार, बाजार समितीचे सभापती रणीवर राऊत,मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते

  मिरवणुकीच्या अग्रभागी ताालुकयातील विविध गावांतील २ घोडे व त्यावर मावळे अश्वारुढ झालेले होते़ यामध्ये पुण्याचे मातृभूमी ढोलपथक,पुण्याचेच रणवाद्य ढोलपथक, बार्शीचे जय भगवंत ढोलपथक, याशिवाय अथनी(कर्नाटक ) बार्शी व बारामती,जामखेड,सांगली ,चाळीसगाव,येथील सद्गुरु बँण्ड पथके सहभागी होणारआहेत. हनुमान बँजो हे मिरवणुकीचे खास आकर्षण होते.

  बार्शीच्या प्रभात बँडचे सादरकीरण खास होते़ जामखेडच्या ग्रुपने लाठी-काठी ,तलवारबाजी अशा विविध मर्दानी खेळाचे आकर्षक व चित्तथरारक सादरीकरण केले़ तर भव्य अशा डीजे च्या तालावर रणीवीर राऊत यांच्या नेतृत्वाखाली तरुणाई अक्षरशा थिरकली.

  ही तरुणाईचा सागर उसळल्यासारखी परिस्थिती बाजारपेठेत
  होती़ तरुणाई मुक्तहस्ते या मिरवणुकीत नाचली़ जुनाा गांधी
  पुतळा ते तालुका पोलीस स्टेशन या मार्गावर ही मिरवणुक
  पहाण्यासाठी फुल्ल गर्दी झालेली होती.सजवलेल्या
  ट्रॅक्टरमध्ये आकर्षक विद्युतरोषणाई करुन त्यामध्ये
  शिवरायांची मुर्ती ठेवण्यात आली होती़ राऊत चाळ येथून
  निघालेली ही मिरवणुक तेलगिरणी चौक, अमर शेख चौक, पांडे चौक मार्गे छत्रपती नियोजनासाठी बाजार समितीचे सभापती रणीवर राऊत, युवा नेते अभिजित राऊत , रणजीत राऊत , व पट्टम पवार यांच्या नेृत्वाखाली सुमारे शंभर कार्यकर्त्यांची टीम परिश्रम घेतले.

  तालुक्यातील घोड्यावर मावळे स्वार

  बार्शी तालुक्यातील खांडवी, सौंदरे वाणेवाडी आदी गावांतील
  विविध २१ घोडे होते़ या घोड्यावर बाल शिवबांपासून ंविविध
  वेशातील मावळे स्वार झालेले होते़या मिरवणुकीत बाजार
  समितीचे सभापती रणीवीर राऊत, विजय राऊत यांनी देखील
  तरुणाईसोबत नाचण्याचा आंनद घेतला.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur