युवकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
बार्शी प्रतिनिधी :
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
संभाजी नगर बार्शी येथील एका २१ वर्षीय तरुणाने नैराश्यातुन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली याबाबत मयताची आई छाया साहेबराव ईटकर हिने पोलीसात फिर्याद दिली आहे .

यात किरण साहेबराव ईटकर (वय २१ ) याने गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.
आईने दिलेल्या तक्रारीत मयत किरण यास दारुचे व्यसन होते त्याने नैराश्यातुन गळफास घेतले असावे असे म्हटले आहे . याबाबत अधिक तपास बार्शी शहर पोलिस करित आहेत .