बार्शीत मोबाईल चोर सापडला  हॅण्डसेट हस्तगत

  0
  313

  बार्शीत मोबाईल चोर सापडला  हॅण्डसेट हस्तगत

  गणेश भोळे

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  बार्शी प्रतिनिधी :

  झाडबुके कॉलेजच्या मेनगेटवर गाडी लावून डिगीमध्ये दोन मोबाईल ठेवून परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर डिगीचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने दोन्ही मोबाईल हँडसेट पळविल्याची घटना 13 नोव्हेंबर 19 रोजी घडली होती याचा शोध घेत पोलिसांनी एका चोरट्याकडुन  एक हँडसेट जप्त केले आहे.

  यात संशयित आरोपी ओंकार नेमिनाथ भडंगे (वय 21 रा . मानेगाव ता. माढा जि.सोलापूर )असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे .

  याबाबत अधिक माहिती फिर्यादी प्राजक्ता चिवटे व तिची मैत्रीण ही टीव्हीएस वेगो ही दुचाकी  गाडी झाडबुके कॉलेजच्या मेन गेट जवळ पार्क करून गाडीच्या डिक्की मध्ये  दोघींचे मोबाईल डिकीमधे ठेवून परीक्षा केंद्रावर गेल्या होत्या यानंतर डिगीचे लॉक तोडुन ठेवलेले दोन्ही मोबाईल चोरीस गेले होते. त्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध बार्शी पोलीसात गुन्हा दाखल झाला होता.

   यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सुचनेनुसार व पोलिस निरिक्षक संतोष गिरिगोसावी यांचे मार्गदर्शनानुसार सोलापुर सायबर सेल व आयएमईआय नंबर वरून शोध घेतले असता चोरीस गेलेल्या मोबाईलमध्ये ओंकार भडंगे याचे नावाने असलेले  सिमकार्ड असल्याचे निश्पन्न झाले त्यानंतर त्याला पकडुन विचारपुस केल्यानंतर ओकार याने गुन्हा कबुल करत  त्याचेकडुन एक मोबाईल हॅण्डसेट हस्तगत करण्यात आला आहे . त्यावरुन ओंकार भडंगे यास अटक करण्यात आली असुन त्याला आज कोर्टासमोर उभे केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी मिळाली आहे अधिक तपास संताजी आलाट हे करित आहे

  .(ओंकार भडंगे याचा फोटो )

  Best IT Comany In Maharashtra , Solapur