बार्शीत मशिदीत गर्दी करून नमाज पढणार्या 24 जणांवर गुन्हा दाखल
गणेश भोळे
बार्शी – कोरोना प्रतिबंधासाठी संपुर्ण देशात लॉक डाऊन करून संचारबंदी करत एकत्रित येण्यास बंदी घातलेली असतानाही आणि प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश असतानाही बार्शीतील मशिदींमध्ये नमाजासाठी लोक एकत्रित येत असल्याचे पोलिसांच्या तपासणीत उघड झालंय.

यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 24 लोकांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झालाय. या लोकांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना घरीच क्वारंटाईन करण्याचा सूचना देवून सोडण्यात आलंय.
बार्शीत पोलिस प्रशासनाकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येतीय. त्यातून विविध निमित्ताने घराबाहेर पडून वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येणार्या लोकांना प्रतिबंध करण्यात येत आहे.

शहरातील मशिदींमध्ये अजूनही लोक नमाजासाठी गोळा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी भल्या पहाटे पाच वाजता सकाळच्या नमाजावेळी मशिदीमध्ये जावून तपासणी केली. स्वतः पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

शाहीर अमर शेख चौक येथील मदिना मशिदीमध्ये अन्वरुल हक शेख, इम्रान रफिक शेख, हाजी अब्दुल हमीद तांबोळी, याकुब हसन चौधरी, रहेमान महंमद तांबोळी, सोमवार पेठेतील पांडे चौकातील मक्का मशिदीमध्ये ताहीर हुसेन जलाउद्दीन शेख, जाफार युसूफ पठाण, नुह अमीर मुल्ला, अय्युब हसन बागवान, मकसुद बिलावर बागवान.
तर एकविराई चौकानजीकच्या मेहदी नगरमधील महेदी मशिदीमध्ये मुसा मोहंमद हनीफ मोमीन, युनुस अब्दुल चाबरु, अख्तर अब्दुल समद मोमीन, कुदरतमियॉ अबुबकर गिड्डे, महंमद इसाक मोहमंद हनीफ चौधरी, अन्वर महंमद बाबुडे, सिकंदर महामुद मोमीन, जिलानी अबुबकर मेहंदी, रहेमान युसूफ बासरी, अय्युब मंजूर बाबुडे, सादीक महेदीमियॉं जलसे, महंमद हाजी नजीर लांडगे, महमंद युसुफ खुदाबक्ष वांगी, अब्दुल करीम मज्जीद लांडगे हे नमाजासाठी गोळा झाल्याचे आढळून आले.

त्यांनी हयगयीने आणि बेदरकारपणे वागून स्वत:चा व इतरांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी त्यांच्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात आलीय.