बार्शीत भूमिअभिलेख कार्यालयातील दोन कर्मचारी लाच घेताना अडकले जाळ्यात

    0
    377

    कर्जाच्या बोजाची मालमत्ता पत्रकावर नोंद घेवून ते मालमत्ता पत्रक देण्यासाठी १ हजार रूपयांची लाच घेताना बार्शीच्या भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक अब्दुल गफार अब्दुल सत्तार कुरेशी (वय ४६ रा. उत्तर सदर बझार, लष्कर सोलापूर) यांना सोलापूरच्या ॲन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. कुरेशी व त्याला मदत करणारा खाजगी व्यक्ती सुधीर नंदकुमार लोंढे (वय ३७ रा. नागणे प्लॉट, बार्शी) यांच्याविरूध्द बार्शी शहर पोलीसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. 

    या बाबत सवित्तर माहिती अशी की यातील तक्रारदार यांनी मालमत्तेवर कर्ज घेतले होते. सदर कर्जाच्या बोजाची मालमत्ता पत्रकावर नोंद घेण्यासाठी आणि ते मालमत्ता पत्रक देण्यासाठी १०००/- रूपये लाचेची मागणी येथील लिपीक कुरेशी व खाजगी इसम सुधीर लोंढे यांनी केली होती. यातील तक्रारदार यांची बार्शी येथे स्थावर मालमत्ता असून सदर मालमत्तेवर त्यांनी व्यवसाय वाढीसाठी ५,००,०००/- रूपये कर्ज काढले होते.

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


    सदर कर्जाची मालमत्ता पत्रकावर नोंद घेवून मालमत्ता पत्रक मिळण्यासाठी तक्रारदार यांच्या आईने उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, बार्शी येथे दिनाक २३.०१.२०२० रोजी अर्ज दिला होता. तसेच त्यासाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्र देखील सादर केले होते.

    परंतू त्यावरून मालमत्ता पत्रकावर अद्याप नोंद घेतली नव्हती. त्यामुळे अर्जदार यांनी सदरचे काम पाहणारे लिपीक कुरेशी व त्यांना कामात मदत करणारे खाजगी इसम सुधीर लोढे यांची भेट घेतली असता त्या दोघांनी तक्रारदार यांचेकडे १२००/- रूपयांची लाच मागणी केली होती.

    तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी त्याबाबत सविस्तर तक्रार अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर कडे तक्रार केली होती.

    यामुळे सदर तक्रारीची दि.०२.०३.२०२० रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर यांच्याकडून पडताळणी करण्यात आली होती. त्यामध्ये तक्रारदार यांना भूमी अभिलेख कार्यालय बार्शी येथील परीरक्षण भूमापक श्री. कुरेशी व त्यांना मदत करणारे खाजगी इसम सुधीर लोंढे यांनी सदर नोंद घेवून मालमत्ता पत्रकाचा उतारा देण्यासाठी १२००/रूपयांची मागणी केली, त्यावर तक्रारदाराने केलेल्या तडजोडीवर ती रक्कम १०००/- रूपये घेण्याचे मान्य केले.

    त्यावरून भूमी अभिलेख कार्यालय, बार्शी येथे लावण्यात आलेल्या लाचेच्या सापळ्यामध्ये तक्रारदर यांचेकडून आरोपी कुरेशी यांनी लाचेची रक्कम १०००/- रूपये लाच स्विकारल्यानंतर रंगेहात पकडण्यात आले आहे.

    यातील अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार कुरेशी वय ४६ वर्षे, परीरक्षण भूमापक, उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, बार्शी (वर्ग ३), रा. उत्तर सदर बझार, लष्कर सोलापूर, सोलापूर व सुधीर नंदकुमार लोंढे, खाजगी इसम, वय ३७ वर्षे, रा. नागणे प्लॉट, बार्शी, जि. सोलापूर यांच्या विरूध्द बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे.

    सदरची कारवाई राजेश बनसोडे, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे व संजय पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे तसेच संजीव पाटील, पोलीस उपअधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली आहे.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur