बार्शीतील बेकायदेशीर व्यवसाय पुर्णपणे बंद करणाच्या व अन्य मागण्यासाठी
भाऊसाहेब आंधळकर यांचे बेमुदत चक्री उपोषण सुरू
उपोषणाला सोपल, मिरगणे यांचाही पाठींबा
सपोनि येडगेवर राजकीय दबावाखाली कोणतीही कारवाई करू नका
शिवजयंती मिरवणुकीत वापरलेला ओरीजनल डॉल्बी जप्त करा
बेकायदेशीर व्यवसायिकांवर कारवाई करा

बार्शी : सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी बार्शीतील बेकायदेशीर
व्यवसाय बंद करण्याच्या व अन्य मागण्यासाठी शहर पोलीस स्टेशन समोर बेमुदत चक्री उपोषण सुरू केले
आहे.
आज दि.२ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता आंधळकर यांनी उपोषणास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या
समवेत नगरपालिका विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे, माजी नगराध्यक्ष दगडूनाना मांगडे, शिवसेना
शहरप्रमुख दिपक आंधळकर, माजी नगरसेवक राजाभाऊ काकडे, भाजपा शहराध्यक्ष अश्विन गाढवे,
तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील, विस्तारक बाबा शेख, बाळासाहेब पवार, नाना पाटील, बाजार समितीचे संचालक
साहेबराव देशमुख, कुणाल घोलप, सुशील पाटील, अविनाश शिंदे, मांडेगावचे सरपंच पंडीत मिरगणे. सौ.पद्मजा
काळे, सौ.प्रतिभा मुळीक, सूर्यकांत देशमुख, विजयसिंह देशमुख, शिरीष घळके, महेदिमियाँ लांडगे, आशु
सय्यद, शिवाजी खोडवे, रवि सांगोळे, संभाजी आगलावे, सुरज गव्हाणे, इकबाल शेख, सुशांत गायकवाड, बापू
काळे, राजेंद्र गायकवाड, शंकर चव्हाण आदी उपस्थित होते.या उपोषणास माजी मंत्री दिलीप सोपल व भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांनीही पाठींबा दिला आहे.
या
संदर्भात दिलेल्या निवेदनात सोपल यांनी असे म्हटले आहे की, दि.२२ फेब्रुवारी २०२० रोजी शिवजयंती
मिरवणुकीमधील विना परवाना बेकायदेशीर वाजवलेला डि.जे. तो आडवुन त्याचेवर कायदेशीर कारवाई करत
असलेल्या ए.पी.आय, येडगे आणि स्टाफ यांचे सरकारी कामात अडथळा करून दमदाटी करून डि.जे. घेऊन
जाणाऱ्या राजकीय नेत्यावर, त्याच्या मुलावर व त्यांचे गुंडावर भा.द.वि. कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे
गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी.
वरील दिवशी शिवजयंती मध्ये वापरलेला (ओरीजनल डि.जे.) जप्त करून ताब्यात घेऊन त्याचेवर
कायदेशीर कारवाई करावी. (सी.सी.टी.व्ही तपासावे)असे म्हटले आहे.