बार्शीत बीएसएनएल’च्या 19 कर्मचाऱ्यांनी घेतली ‘व्हीआरएस’

  0
  439

  काळानुसार ‘बीएसएनएल’मध्ये बदल होणे गरजेचे होते

  ‘बीएसएनएल’चे उपमंडल अभियंता- एफ. ए. सय्यद

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  बार्शी / प्रतिनिधी
  एकेकाळी दळणवळण साधनात
  सरकारच्या बीएसएनएल पहिल्या क्रमांकावर असायची, त्यामुळे सरकारकडे महसूल मोठ्या प्रमाणात जमा होत होता. या महसुलामुळे देशाच्या विकासाला हातभार लागला आहे. परंतू बदलत्या काळानुसार बीएसएनएलमध्ये देखील बदल होणे गरजेचे होते. बदल न झाल्यामुळे आज देशभरात 92 हजार पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी ‘व्हीआरएस’ योजनेत सहभागी होत निवृत्ती घेतली आहे, असे प्रतिपादन ‘बीएसएनएल’चे उपमंडल अभियंता एफ. ए. सय्यद यांनी केले.

  बार्शीतील गोकुळ किल्ला येथील ‘बीएसएनएल’च्या टीआरसी क्लबच्या वतीने दिनांक 29 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता ‘व्हीआरएस’ घेतलेल्या एकोणीस कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

  यावेळी कनिष्ठ दूरसंचार अधिकारी जी.बी. भड, दूरसंचार अधिकारी डी.ए. पाटील, कनिष्ठ दूरसंचार अधिकारी व्ही.के. शेगडकर आदी उपस्थित होते.

  डी.ए. दयानंद पाटील म्हणाले, बीएसएनएल कुटुंब मोठे आहे, आज निवृत्त कर्मचाऱ्यांना निरोप देताना
  दुःख होत आहे, परंतु कामातून जरी निवृत्त झाले असले तरी आपल्या गाठी भेटी होत राहतील त्यामुळे आपल्यातला स्नेह कमी होणार नाही. आज सर्वांकडे पैसे आणि वेळ भरपूर असणार आहे. त्यामुळे जगण्याचा पुरेपूर आनंद घ्या.

  यावेळी एस. एस. जवळगी, व्ही.एस. पाटील, व्ही.एच. जोशी, ए. एन. बारगजे, एच. एस. बारावकर, एस. आर. महिमाने, एफ. डी. पटेल, डी. आर. पवार, पी.व्ही. चेचे, एम. डी. गोडेकर, एल.एस. घुघे, डी.बी. शिंदे, एम. ए. नागटिळक, ए. सी. मणियार, आर. ए. निंबाळकर, एस. के. नरुटे, , एस. जी. शिंदे,ए. एन. इंगळे, ए. एन. अंगारखे या एकोणीस कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ, शाल आणि भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

  सूत्रसंचलन पी.व्ही. चेचे यांनी केले. आभार गणेश भड यांनी केले.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here