बार्शीत प्रजासत्ताकदिनी महिलांसाठी कर्करोग तपासणी व मार्गदर्शन शिबीर

    0
    498

    बार्शीत महिलांसाठी कर्करोग तपासणी व मार्गदर्शनचे आयोजन
    प्रतिनिधी ।  बार्शी 
        येथील साई संजीवनी हॉस्पिटल, बार्शी केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, बार्शी आणि उज्वल सामाजिक संस्था यांचे संयुक्त विद्यमाने अ.भा.केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष, आमदार जगन्नाथ शिंदे यांचा वाढदिवस तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत कर्करोग मार्गदर्शन व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


        दि.२६ रोजी दुपारी १२ ते २ दरम्यान स्व.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम होत असून कॅन्सरतज्ञ डॉ.राहूल मांजरे यांचे महिलांच्या गर्भाशयाचे अथवा स्तनाचे कर्करोग विषयीचे विशेष मार्गदर्शन होत आहे.  तसेच इतरही तज्ञ डॉक्टरांकडून कर्करोग जनजागृती विषयक मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त महिला एकत्र येणार असल्याने उज्वला सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सहभागी झालेल्या महिला रूग्णांना आवश्यक चाचण्यांसाठी सवलत दिली जाणार आहे. या मार्गदर्शन शिबीरासाठी महिलांचे बचतगट, शैक्षणिक संस्था, कार्यरत संस्थांसह परिसरातील महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


        कार्यक्रम यशस्वीतेसाठी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा कार्यकारीणी सदस्य अभिजीत गाढवे, तालुकाध्यक्ष सुधीर राऊत, सचिव मोईज काझी, खजिनदार प्रशांत बारसकर, हेमंत गांधी, सचिन मांजरे, योगेश फोपले, उज्वल सामाजिक संस्थेच्या उज्वला कदम, रेश्मा बागवान, दिपाली बारंगुळे व सदस्य परिश्रम घेत आहेत.


        केमिस्ट असोसिएशनचे आमदार जगन्नाथअप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शहरातील औषध विक्रेत्यांच्या अंतर्गत स्पर्धांचे आयोजन करण्यात अाले होते. नागरिकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून आरोग्य व औषधांविषयीची जनजागृती करणे, कायदेशीर बाबींची पूर्तता करून अद्ययावतीकरण करणे या बाबींचा यातील निकषांमध्ये समावेश होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांतून अरिहंत मेडिकल (प्रथम), योगीराज मेडिकल (द्वितीय), न्यू बाहुबली मेडिकल व अंबिका मेडिकल (तृतीय) यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेचे परिक्षण ज्येष्ठ केमिस्ट विजय वाई, अभिजीत गाढवे यांनी केले आहे. विजेत्यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. 

    Best IT Comany In Maharashtra , Solapur

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here