बार्शीत पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या;वाचा सविस्तर

0
278

बार्शीत पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या;वाचा सविस्तर

गणेश भोळे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी : शहरातील अलिपूर रस्त्यावर पुनमिया प्लॉटमध्ये राहत्या घरी पती- पत्नीने कौटुंबिक कलहातून गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबरसिंग परदेशी (वय ६२), सुनीता परदेशी (वय ५५) असे फाशी घेतलेल्या पती -पत्नीचे नाव आहे. घरी बेडरूममध्ये लोखंडी अँगलला एकाच दोरीने दोघांनी रात्री साडेनऊच्यानंतर फाशी घेतली. 
 

धीरज परदेशी त्यांच्या मुलाने पोलिसांत माहिती दिली असून त्यांची पत्नी विजयालक्ष्मी हिचे आई-वडिलांसोबत भांडण झाले होते. धीरज हा डॉ. अंधारे रुग्णालयात रोखपाल म्हणून नोकरीस आहे. कामावर असताना सायंकाळी आईच्या फोनवरून पत्नी विजयालक्ष्मी हिने धीरजला ताबडतोब घरी या भांडण सुरू आहे असे सांगितले होते. त्यावेळी ते रात्री साडेआठ वाजता घरी आले. त्यावेळीही भांडण सुरूच होते. शेजाऱ्यांनी येऊन समजावून सांगून भांडण मिटवले. 

पत्नी मुलांना दूध आणण्यासाठी खाली
आली वडील व आई तळमजल्यावरील त्यांच्या बेडरूममध्ये झोपण्यास गेले. पत्नीसह आम्ही दोन मुलांसह पहिल्या मजल्यावर झोपण्यास गेलो होतो. पत्नी मुलांना दूध व पाणी आणण्यासाठी रात्री अकराच्या दरम्यान खाली आली. त्यावेळी आई-वडिलांच्या बेडरूमचा दरवाजा बंद होता.

वडिलांना फोन केला; परंतु त्यांनी उचलला नाही. दरवाजा ढकलून पाहिला तर आतून कडी होती. त्यामुळे संशय आला. पुन्हा शेजाऱ्यांना बोलावून खिडकीची काच फोडून आत पाहिले असता लोखंडी अँगलला एकाच दोरीने आई-वडिलांनी फाशी घेतली असल्याचे समजले. पोलिसांना याबाबत त्वरित माहिती दिली. 

Best IT Comany In Maharashtra , Solapur