चोरीच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या चोरावर
नगरसेवकाचा हवेत गोळीबार
बार्शी : चोरीच्या उद्देशाने कारखान्यात दबा धरून बसलेल्या चोरट्यांस पकडण्यासाठी गेलेल्या कारखाना मालकाने स्वसंरक्षणासाठी हवेत चार गोळ्याचे राऊंड उडवल्याचा प्रकार खांडवी ता.बार्शी शिवारात आज दि.22 मार्च रोजी पहाटे 3 वाजुन 40 मिनिटानी घडला. याप्रकरणी चोरीच्या उद्देश्याने लपलेल्या फिरोज फक्रुद्दीन शेख रा.मनमाड यास बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली
नागेश अर्जुन दुधाळ वय- 47 रा.शेडगे प्लॉट उपळाई रोड बार्शी या नगरसेवकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते खांडवी येथे शेती करून व पेव्हीग ब्लॉकचा कारखाना चालवुन कुटुंबाचा उदर्निर्वाह करतात.त्यांच्याजवळ संरक्षाणासाठी परवानाधारक पिस्तुल आहे.दि.22/03/2020 रोजी बार्शी येथे ते घरी असताना कारखाण्यातील कामगार सुर्दशन मिरगणे यांचा पहाटे 03.12 वाजता फोन आला की आपल्या खांडवी येथील कारखाण्यावर चोर आले आहेत. त्यानंतर लगेच ते व भाचा रोहण शंकर काळे व गोटु तानाजी चौधरी असे मिळुन बार्शी वरून कारखाण्याकडे निघाले.

त्यावेळी हॉटेलचे मॅनेजर सोमनाथ इंगळे याला फोन करून सदरची बाब सांगुन त्यासही कारखाण्यावर येण्यास सांगितले. त्यानंतर सर्वजण कारखाण्यावर गेले असता तेथे एक इसम लपलेला दिसला.फिर्यादी त्याच्या जवळ जात असताना चोरटा हा जवळ पडलेला लोंखडी गज उचलुन डोक्यात मारण्यासाठी फिर्यादीच्या अंगावर धावुन येवु लागला. त्यामुळे दुधाळ यांनी पिस्टल मधुन हवेत चार राउड फायर केले. त्यावेळी तो इसम जागीच थांबला.
त्यांस पकडल्यावर आपले नाव फिरोज फक्रुद्दीन शेख रा.मनमाड असे सांगितले. सदर ठीकाणी येण्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की,मी पाठीमागील गावावरून एक गाय चोरून आणली आहे व मी तुमच्या येथे चोरी करण्यासाठी आलो आहे.
त्यानंतर त्यास आम्ही सदर गाई विषयी विचारणा केली असता त्यांने बाहेर ठेवलेल्या मशीनला बाधलेली गाय आम्हाला दाखवली त्यावेळी आमची खात्री झाली की, सदरचा इसम हा कारखाण्यावर चोरी करण्याचे उद्देशाने आला असुन त्याने त्याच्या ताब्यातील गाय कोठुन तरी चोरी करून आणली आहे.याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.