बार्शीत चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत मुख्य बाजारपेठेतील सात दुकाने फोडली
बार्शीतील मुख्य बाजारपेठ एकाच रात्रीत सात दुकाने फोडुण अडीच लाख रूपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार आज दि.२८ शनिवारी सकाळी उघडकीस आला.एकाच रात्रीत तब्बल सात दुकाने फोडण्यात आली असल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

गणेश भिमराव कानडे वय ३९ वर्षे रा. खंडोबा मंदीराजवळ सौंदरे ता.बार्शी यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
उचकटलेल्या शटर मधुन त्यांनी आत जावुन पाहीले असता दुकानातील सामान आस्थाव्यस्थ पडलेले होते तसेच टेबल कांऊटरचे ड्रॉवर उघडे दिसले. त्यामुळे दुकानातील ड्रॉवर व इतरत्र पाहीले असता ड्रॉवरमधील रोख रक्कम व जिन्स पॅकीगचा एक डाग दिसुन आला नाही. त्यामुळे दुकानात चोरी झाल्याचीखात्री झाली.
चोरट्यांनी रोख रक्कम २० हजार रूपये, ४७ हजार रूपयांचे जिन्स पॅन्ट चे १०० नग असलेला जिन्स पॅकीगचा डाग असा ६७ हजाराचा रोख रक्कम व जिन्स पॅन्ट चोरट्यांनी लंपास केले.

हे माझे दुकानामधुन चोरीस गेले असुन ते परत मिळुन आलेस तसेच बार्शी शहर बाजारपेठ परीसरातील अमित माधव आपटे याचे जुनी चाटे गल्ली येथील आपटे मेडीकल दुकान फोडुण रोख रक्कम ४ हजार,
प्रविण दलाराम राठोड याचे पांडे चौक येथील सुरज गारमेंट दुकान फोडुण रोख रक्कम ४ हजार, अनाराम रूपाराम चौधरी याचे महावीर मार्ग बार्शी येथील पिकॉक लाईफ स्टाईल दुकानामधुन रोख रक्क्म रूपये ४० हजार,अनाराम रूपाराम चौधरी याचे महावीर मार्ग बार्शी येथील पिकॉक लाईफ स्टाईल दुकानामधुन ३९ हजार रूपयांचे१६ नग लेडीज ड्रेस.
गौस म.रफिक तांबोळी याचे राउळ गल्ली टाकणखार रोड येथील जी.एम ट्रेडर्स दुकानामधुन रोख रक्कम ४ हजार रूपये,
रणजित संजय आंधारे याचे तेलगिरणी चौकातील रोहीत एजन्सी तेल दुकानामधुन ७० हजार रोख रक्कम, संदीप विजयकुमार बगले याचे सावळे सभागृहचे समोर लातुर रोड येथील बगले मेडीकल दुकान फोडुण १८ रू रोख रक्कम असा अडीच लाखाचे साहित्य व रोख रक्कम चोरीस गेली. याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.