बार्शीत गोवंशजातीचे मांस पकडले ; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

    0
    268

    बार्शीत गोवंशजातीचे मांस पकडले ; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

    बार्शी :  येथील गाडेगाव रोड यमाई मंदीराजवळ बेकायदेशीररित्या पाळीव जनावरांची माणकेश्वर येथे कत्तल करून त्याचे अवयव पीकअप गाडीतुन घेऊन जाताना मिळुन आल्याप्रकरणी दोघांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . हि घटना ११ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ८ वाजता घडली .पीकअप सह मांंस सुमारे २ लाख २५ हजार ५०० रुपयाचा मुुद्देमाल जप्त .

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    यात महेबुब बकरू कुरेशी ( वय२२ रा .माणकेश्वर ता. भुम ) व ईकरार आरीफ सौदागर (वय ४९ रा .मंगळवार पेठ बार्शी ) या दोघा आरोपी विरुध्द गुन्हा नोंद झाला आहे .

    याबाबत अधिक माहीती की पोलिस संदेश कृष्णदेव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की उपविभागीय अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे यांचे आदेशान्वये अवैध धंदेवर कारवाईसाठी पोकॉ बाळकृष्ण मुठाळ व माळी यांचे समवेत पेट्रोलिग करत असताना गाडेगाव रोड यमाई मंदीरा जवळ आले असता  रोडवर बार्शीकडे येण्याच्या दिशेने उभा असलेला पीकअप क्र एमएच ४२एम ६०६८ मिळून आला यावेळी संशय आल्याने चालकास विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याचे समवेत पाठीमागे जावुन पाहीले असता पीक अपमध्ये मांस असल्याचे सांगितले यावेळी आधिक विचारपुस केली असता सुमारे १५० किलो वजनाचे मांस माणकेश्वर येथुन कत्तल करून ते घेऊन बार्शी येथे चालल्याचे सांगितले.

    याबाबत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरूध्द भादवि ४२९,३४ महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ कलम ५,६,७ व पशुक्रुरता कलम३८(३ ) चे सुधारणा महाराष्ट्रा प्राणी सुधारणा अधिनियम१९९५चे कलम ५ ( क ) ( ड ) ९ सहविषयक क्रुरता प्रतिबंधक कायदा कलम३ प्रमाणे सरकारतर्फे फिर्याद दिली आहे .

    Best IT Comany In Maharashtra , Solapur