बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग हा वरचेवर वाढतच आहे. कोरोना वाधितांचा आकडा देखील 32 वर पोहचला आहे.त्यात सोमवारी वैराग येथील 68 वर्षीय बाधित वृद्धाचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने रात्री जाहीर केले. तालुक्यात जामगाव (आ) नंतर हा दुसरा मृत्यू असून मृतांची संख्या दोन झाली आहे. तालुक्यातील 34 जणांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी दिली.

सोमवारी रात्री वैराग येथील 68 वर्षीय वृद्ध पुरुषाचा रिपोर्ट प्राप्त झाला असून त्यांना खासगी रुग्णालयात 6 जून रोजी उपचारासाठी दाखल केले होते. यापूर्वी बार्शी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना 22 जून रोजी एका बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या रुग्णाचा रिपोर्ट कोरोनाबाधित आला होता.

दरम्यान, कसबा पेठ हांडे गल्ली येथील एक स्त्री, शिवाजीनगर येथील एक स्त्री तर उपळाई ठोंगे येथील एक पुरुष असे तिघे जण कोरोनाबाधित आढळले होते. त्यांच्या संपर्कातील 32 जणांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. यात 19 पुरुष, 13 स्त्रियांचा समावेश आहे. कोरोनाबाधित दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनाने त्या रुग्णाच्या संपर्कातील बार्शी येथील 17 तर वैराग येथील सात जणांचे स्वॅब घेतले आहेत.
