बार्शीत आमदार राजेंद्र राऊत आणि भाऊसाहेब आंधळकर यांच्यात बाचाबाची; दहा मिनिटात बाजारपेठ झाली बंद; वाचा सविस्तर-

    0
    263

    गणेश भोळे

    बार्शी:बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत व शिवसेनेचे स्थानिक नेते तथा माजीपोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांच्यात  अचानक समोरासमोर आल्याने  झालेल्या बाचाबाचीमुळे शहरात तणावपूर्ण निर्माण शांतता होती.ही घटना सोमवारी (ता.16) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास सोमवार पेठेतील बागवान मस्जिद च्या शेजारी मुख्य रस्त्यावर घडली.

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    दरम्यान रात्री उशीरापर्यंत या घटनेची  तक्रार किंवा फिर्याद शहर पोलीसांत दाखल झाली नव्हती.पण हा प्रकार नेमका कशामुळे घडला हे मात्र समजू शकले नाही.याप्रकरणी रात्री उशिरा दोन्ही नेत्यांनी असा काही प्रकार घडला नाही, कार्यकर्त्यांनी काही पोस्ट सोशल मीडियावर करू नये. सर्वांनी शांत राहावे असे आवाहन केले आहे.

     दोन राजकीय नेत्यांत झालेल्या बाचाबाचीचे पडसाद  शहरात तात्काळ उमटले. यामुळे उमटून सोमवार पेठ, पांडे चौक परिसरातील व्यापार्‍यांनी भीतीपोटी आपली दुकाने बंद केली. 

    दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी हे पोलीसांचा फौजफाटा घेऊन घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी याठिकाणी जमलेल्या जमावाला हटवले.

    शहरातील  सोमवार पेठ, घटना घडलेले ठिकाण,भोसले चौक, राऊत चाळ व शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.दरम्यान राऊत चाळ व भोसले चौक याठिकाणी आमदार राजेंद्र राऊत समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. राऊत गटाचे सर्व प्रमुख पदाधिकारी ही याठिकाणी आले होते.

    शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता राहण्यासाठी शहर पोलीस कर्मचार्‍यांसह तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रात्रीची गस्त देखील वाढविण्यात आली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक झेंडे हे घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

    सोमवार पेठेतील रसाळ यांच्या दुकानासमोर भाऊसाहेब आंधळकर हे त्यांच्या आईच्या नावाने अन्नछत्र चालवतात. त्याठिकाणी ते बसलेले होते. तर त्याच समोर नगराध्यक्ष आसिफ तांबोळी यांचा पुतण्या बिलाल तांबोळी यांच्या तांबोळी इंटरप्रायजेस या ज्यूस च्या दुकानाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते आज रात्री उदघाटन होते.,त्यासाठी राऊत हे तेथे आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur