बार्शीत अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार ,आरोपीस अटक
बार्शी प्रतिनिधी
एका युवकाने अल्पवयीन मुलाला दुधाची पिशवी आणुन दे ,तुला पैसे देतो असे म्हणून घरात नेऊन त्याचेवर अनैसर्गिक अत्याच्यार केला.व झालेला प्रकार कोणास सांगु नको सांगितले तर तुला मारेन अशी धमकी दिल्या प्रकरणी पिडीत मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादिनुसार बार्शी पोलिसात एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला असुन यातील आरोपीस अटक करण्यात आले आहे .

यात आरोपी अकबर उर्फ टिपु शेख याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटले की दि ५ मार्च रोजी रात्री ९ : ३० वाजता पिडीताचे घरी सर्वजण जेवणासाठी बसले असता पिडीत मुलाला नीट बसता येत नसल्याने याबाबत आईने तुला काही लागले का असे विचारले मात्र पिडीताने काही लागले नसल्याचे सांगितले . मात्र घरातील सगळे मिळुन त्यास विचारले असता पिडीत अल्पवयीन मुलाने यातील आरोपी अकबर उर्फ टिपु शेख याने त्याचे सोबत केलेला सर्व प्रकार सांगितला .याबाबत अधिक तपास बार्शी पोलिस करित आहेत