बार्शीतील मेहेर किडस् नर्सरीच्या बाळगोपाळांनी आनंदपर्व ‘ एकांकिकेतून उलगडला बाबा आमटेंचा जीवनप्रवास

    0
    268

    नाटक हे जगण्याची जिद्द शिकवतो _ सिने अभिनेत्री मालपेकर ‘आनंदपर्व ‘ या बालनाट्य एकांकिकेचे केले सादरीकरण

    बार्शी : मुलांना आपली कला सादर करण्यासाठी ठिकठिकाणी प्लॅटफॉर्म मिळत आहे त्यामुळे मुलांनी मिळालेल्या संधीच सोनं कराव सध्या टिव्ही सिरिअलचा जमाना आहे .मात्र स्पर्धाच्या युगात जो   स्टेज (नाटक )करतो तो कायम टिकतो तर नाटक हे जगन्याची जिद्द शिकवतो .त्यामुळे आपल्याला कितीही यश आलं तरी माणूस म्हणून अधिक चांगल बना असे मत सिनेअभिनेत्री साविता मालपेकर यांनी केले .

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    ते मेहेर किडस् नर्सरी बार्शी आयोजित व प्रा . विजयश्री पाटील लिखित  आनंदपर्व या एकांकिका नाटकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते . 

    यावेळी फु बाई फू व सिनेअभिनेत्री  सुविता मालपेकर , वरीष्ठस्तर दिवानी न्यायाधिश तेजवंतसिंग संधु, विनय संघवी, जयकुमार शितोळे , ला.वैभवी  बुडुख,  संजय पाटील, आखिल भारतीय नाटय परिषदचे बार्शी शाखा अध्यक्ष सोमेश्वर घाणेगावकर ,शुभदा यंदे यांनी उपस्थीत होते.

    यावेळी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात बालनाट्य कलाकारांनी बाबा आमटे यांच्या जीवनावर आधारित आनंद पर्व या नाटकाचे सादरीकरण केले. यात बाबा आमटेची भुमिका अर्णव भोरे तर साधनाताई – सिध्दी लोळगे, प्रकाश आमटेची अर्णव बोराडे ,महात्मा गांधीच्या भुमिकेत आर्यन डुकळे तर सिस्टर लिलाच्या वेदीका बारबोले यांनी भुमिका केल्या यांचे सह ४७ बालकलाकारांना सहभाग घेतला

    तसेच यावेळी विजयश्री पाटील म्हणाले की बार्शीत बालनाट्य रुजलं नाही त्यामुळे आनंदपर्वच्या माध्यमातुन याची सुरवात केली आहे . हे बालनाटय बाबा आमटे यांचे वर आधारित आहे यात आम्हाला व्यापक रुप करायचय यासाठी मागील वर्षाप्रमाणे यंदाही बालनाटय शिबीर घेतले जाणार आहे.


     यासाठी ज्यांना अभिनयाची आवड आहे त्यांनी संपर्क करावं मेहेर किडस मध्ये अभ्यासाचा प्रवास खुप छान चालु आहे . ऑलंपियाडमध्ये शाळेतील ३० पैकी  २७ पदक मुलांना मिळाले आहेत .तर मोबाईलचा वापर शक्यतो टाळा त्याचा अभ्यासावर परिणाम होते टिव्ही चा मोह टाळत टिव्ही पाहण्यायचा मर्यादा वेळ ठरवा असे मत उद्योजक विनय संघवी यांनी मांडले .

    या एकांकिसाठी सुजाता धनवडे, स्नेहल कदम, निशा तावसकर,गंगा पवार,  आशिष फल्ले , बालाजी पोकळे ,निलेश  गायकवाड आदी नी परिश्रम घेतले

    Best IT Comany In Maharashtra , Solapur