या सावित्री ना सलाम ….बार्शीतील महिला पोलिसांची ऑन ड्युटी संक्रांत
गणेश भोळे
बार्शी : मकर संक्रांत म्हंटल की महिलांचा उत्साहाचा सण.. घराघरातील प्रत्येक महिला नटून थटून देवाला ववसण्यासाठी जातात. हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतात. मात्र पोलीस दलात नौकरी साठी असणाऱ्या पुरुष असो की महिला यांना कधीच घरी सण उत्सवात सहभागी होता येत नाही. कारण त्याना ड्युटी असते, समाजाची काळजी असते, सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी असते त्यांच्या खांद्यावर.

बुधवारी मकर संक्रांतीच्या दिवशी बार्शीतील भगवंत मंदिरात महिलांची मोठी गर्दी असते. त्यामुळे महाद्वार चौकातून हा रस्ता बंद असतो. याठिकाणी टगे येऊ नयेत म्हणून चोख पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली लावला होता. विशेष म्हणजे संक्रातीसाठी नटूनथटून बाहेर न जाता बार्शी शहर पोलीस स्टेशन मधील महिला अधिकारी व पोलीस कर्मचारी आज बंदोबस्तातही संक्रांत सणाचा आनंद बंदोबस्ताची ड्युटी करून घेत होत्या.या फोटो मध्ये पोलीस उप निरीक्षक प्रतिभा ठाकूर , महिला पोलीस अमृता गुंड , सिंधूताई देशमुख, दीपा ओहोळ, शबाना कोतवाल दिसत आहेत.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
बार्शी लाईव्ह वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-