जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने दिला जाणारे जिल्हास्तरीय लघुउद्योग क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाले असून सोलापूर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट लघु उद्योग म्हणून बार्शीतील सौदागर आणि नितीन माणिक नवगिरे यांच्या नवगिरे पेट्रो केमिकल या व्यवसायाला जाहीर झाला आहे.

नवगिरे बंधूनी ऑईल रिफायनरी क्षेत्रात इतर समाजाची मक्तेदारी मोडत काडत आपली वेगळी ओळख निर्माण करून उत्तुंग यश मिळवले आणि आपल्या समाजातील उद्योजकांना एक आदर्श निर्माण करून दाखवला. अपार कष्ट , चिकाटी आणि एकी अंगी बाळगून त्यांनी शिरपेचात हा एक मानाचा तुरा रोवला आहे. 26 जानेवारी रोजी सोलापूर येथे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.अशा या बंधूंना या वर्षीचा सोलापूर जिल्हा लघु उद्योजक क्षेत्रातील प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.त्यांच्या या निवडीबद्दल महेश करळे, भारत कदम, सचिन मडके यांनी अभिनंदन केले आहे.