बार्शीच्या महाराष्ट्र विद्यालयास ISO मानांकन प्राप्त;जिल्ह्यातील पहिले हायस्कूल

    0
    275

    महाराष्ट्र माध्य.व उच्च माध्य. विद्यालय, बार्शीस ISO मानांकन प्राप्त

    बार्शी प्रतिनिधी :

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतून महाराष्ट्र माध्य. व उच्च माध्य.विद्यालय बार्शी ही शाळा ISO – 9001- 2015 मानांकन मिळवणारी जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली.

     विद्यालयास ISO प्राप्त करण्यासाठी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे पदाधिकारी,कार्यकारिणी सदस्य व शालेय समिती यांचे सहकार्य लाभले.या पुरस्कारासाठी विद्यालयाचे प्राचार्य  डी.बी. पाटील यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे. पाटील यांनी शाळेला शिस्त लावून गुणवत्ता वाढीकडे ही विशेष लक्ष दिले आहे. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी घेतलेल्या परिश्रमा मुळे शाळेला यश मिळू शकले.

    विद्यालयाची तपासणी करताना तपासणी पथकाने शाळेच्या नवीन उभारलेल्या सर्वकष व डिजिटल विज्ञान प्रयोग शाळेमध्ये सर्व विद्यार्थी प्रयोग करू शकतील याचे विशेष कौतुक केले. ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून औदुंबर उकिरडे (माध्य) जि.प. लातूर, विष्णू कांबळे उपशिक्षणाधिकारी (प्राथ) जि.प. सोलापुर, बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे व पर्यवेक्षक संजय पाटील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी संचालक डॉ.गुलाबराव पाटील,डॉ. मीनाक्षी पाटील,संस्कृतीक विभाग प्रमुख जे.सी.शितोळे व वैशाली शितोळे यांचे हस्ते सन्मान पूर्वक ISO मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

    तसेच विद्यालयास ISO मानांकन मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डाॅ. बी.वाय.यादव,उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, सचिव व्ही.एस.पाटील, गुणवत्ता विकासाचे चेअरमन  पी.टी.पाटील, खजिनदार  दिलीप रेवडकर,सांस्कृतिक विभागाचे चेअरमन जे.सी.शितोळे,सुरेश  पाटील,ए.पी. देबडवार,कार्यकारिणी सदस्य,सर्व संस्था सदस्य यांनी विद्यालयाचे कौतुक केले.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur