माजी पोलीस निरीक्षक गजेंद्र मनसावाले यांचे निधन
बार्शी: सोलापूर पोलीस दलातील सेवानिवृत्तमाजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र मक्कुराम मनसावाले यांचे आज दि.18 रोजी सायं. 6.30 वा. अल्पशा आजाराने निधन झाले झाले.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा


त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून (बालाजी हौसिंग सोसायटी, कुमठा नाका, सोलापूर) येथून दि.19 रोजी सकाळी ११:०० वाजता निघेल.
मानसावाले यांनी बार्शी शहर पोलीस स्टेशन ला दोन वेळा पोलिस निरीक्षक म्हणून तसेच पांगरी पोलीस ठाण्यात आणि सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये ही सेवा दिली होती. ते बार्शीत प्रचंड लोकप्रिय झाले होते. सर्व क्षेत्रातील व्यक्तीशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबध होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.