बापरे धक्कादायक: सोलापूर शहरात आढळले तब्बल 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

0
456

सोलापूर –गुरुवार दि.11 जून रोजी सोलापूर कोरोना पॉझिटिव्ह संख्या 91 ने वाढून 1401 रुग्ण झालेले होती. कालपर्यंत 123 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर कोरोनावर मात केल्याने 772 जणांना घरी सोडण्यात आले.मात्र शुक्रवार दि.12 जून शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह संख्या 101 ने वाढून 1502 झाली आहे अशी माहिती महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मिळाली आहे. हा आकडा म्हणजे कोरोना सुरू झाल्यापासून सर्वात मोठा आहे. त्यामुळे सोलापूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर चारजणांचा मृत्यू झाला.

शहरातील विनायकनगर, रविवार पेठ, माणिक चौक, सुनीलनगर, न्यू बुधवार पेठ, लष्कर, शिवगंगानगर, यशनगर मुरारजी पेठ, सत्तर फूट रस्ता, संगमेश्वरनगर, अक्कलकोट रस्ता, कुमठा नाका, शासकीय निवासस्थान ई थ्री कुमठानाका, गांधीनगर, अनंत सोसायटी, माैलाली चौक, शोभा देवीनगर, रमांजली चौक, गुडलक हॅाटेल, गणेश बिल्डर, उमेशनगर, हनुमाननगर, समाधानगर, सह्याद्री पार्क, राजीव गांधीनगर भवानी पेठ, सुभाष नगर, मजरेवाडी, बेगम पेठ, स्वामी विवेकानंद नगर, भाग्यलक्ष्मीनगर, लक्ष्मी हौसिंग सोसायटी, जोडभावी पेठ, दत्त चौक, गोल्डफिंच पेठ, कर्णिकनगर,

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मुन्सिलपल कॅालनी, मल्लिकार्जुनगर, नरसिंग गिरजी चाळ, किसान संकुल, नियर शिवशक्ती हॅाटेल, फेस हाईटस, मंत्रीचंडकनगर भवानी पेठ, जेलरोड परिसर, तेलंगी पाच्छा पेठ, गुरुदत्त रेसिडन्सी, सुदर्शन हनुमाननगर, महादेवनगर, न्यू धोंडीबा वस्ती, रामवाडी, कुमार स्वामी नगर, मुस्लिम पाच्छा पेठ, मंत्रीचंडकनगर, व्यंकटेशनगर, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंदनगर, दाळगे प्लाॅट, दाजी पेठ, नामदेवनगर, गांधीनगर, पूर्व मंगळवार पेठ बाळीवेस, सिद्धेश्वनगर, होमकर नगर, भवानी पेठ, रोटे कॅाम्प्लेक्स, गुमटे निवास, विजयालक्ष्मीनगर भाग एक, भवानी पेठ, तोडकर वस्ती बाळे, भाग्य लक्ष्मीनगर मजरेवाडी, सम्राट चौक, आसरा

हौसिंग सोसायटी, चंडकनगर सैफुल, हाजी हजरतखान चाळ, निराळ वस्ती, राठी चाळ, उत्तर कसबा, सोमाणी मंगल कार्यालयाजवळ, पाच्छा पेठ, शीख वस्ती भवानी पेठ, न्यू बुधवार पेठ, मड्डी भवानी वस्ती, कामाक्षीनगर शेळगी, जूना विजापूर नाका, टंकसाळनगर, नागेंद्रनगर, कुचननगर, संगमेश्वरनगर, गवळी वस्ती, लक्ष्मी पेठ, मराठा वस्ती भवानी पेठ, जय मल्हार चौक, शनिवार पेठ, डुमणेनगर, बी ग्रुप विडी घरकूल या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.

शुक्रवारी २५५ अहवालांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी -१५४ अहवाल निगेटिव्ह आले, तर १०१ अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ०९ जण रुग्णालयातून बरे होऊन परत गेले. आज चारजणांचा मृत्यू झाला .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here