फॅशन डिझायनिंग अभियंता मुलीने वाटप केले मोफत मास्क

0
222

फॅशन डिझायनिंग अभियंता मुलीने वाटप केले मोफत मास्क

कु.अभिलाशा घोडकेचा स्तुत्य उपक्रम

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

बार्शी -कोरोना या महाभयंकर विषाणूपासून बचाव करण्यासाठी बार्शी शहरातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या शहर व तालुका पोलिस ठाणे कर्मचारी , वैद्यकिय कर्मचारी,डॉ. जगदाळे मामा हॉस्पीटल, कम्युनिटी किचन जामगाव, ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी स्वतः बनविलेले मास्क मोफत वाटप केले आहेत.

मुळ बार्शीची असलेली कु.अभिलाशा सुनिल घोडके हिचे शिक्षण लातूर येथे झाले आहे. लातुरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅनुफॅक्चरींगचा कोर्स पुर्ण केला असून नुकतीच तीची महाराष्ट्र हिंदू खाटीक समाज संघटना प्रणित डॉ.संतूजी लाड स्टूडेंट असोसिएशन च्या नूतन प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

सुरुवातीपासूनच तिला समाजसेवेची आवड असल्याने तिने आपल्या अंगी असलेल्या कलेच्या माध्यमातून स्वतः मास्क बनवून वाटप केले आहे. आतापर्यंत तिने 1000 मास्कचे वाटप केले आहे. कोरोना या विषाणूबाबत जनजागृती करीत कोरोना हा विषाणू जीवघेणा नाही परंतु सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी वडील सुनिल घोडके ,बहिण सौ. प्रियंका काळगे आदी उपस्थित होते. लातुर च्या शासकीय महिला तंत्रनिकेतन येथील ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅनुफॅक्चरींग लातूरच्या सौ.अनुराधा यादव यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबविल्याचे घोडके हिने सांगितले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur