फडणवीसांना ट्रोल करण्यासाठी प्रायव्हेंट कंपनी हायर – आमदार अनिल चोले
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या उणीवा अतिशय चाणाक्षपणे आणि अभ्यासू पद्धतीने दाखवत आहेत. मात्र त्यांना वारंवार ट्रोल केलं जात आहे. फडणवीसांना ट्रोल करायला प्रायव्हेट कंपनी हायर करण्यात आलेली आहे, असा खळबळजनक आरोप भाजप आमदार अनिल चोले यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टवर गेले काही दिवस नेटकरी स्मायली इमोजीचा तसंच कमेंटमध्ये त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत आहेत. राजकीय हेतूमधून त्यांना जाणीवपूर्वक ट्रोल केले जात आहे, असे म्हणत नागपुरातील भाजप नेत्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन ट्रोलर्सवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या राज्यात कोरोनाचे वातावरण असताना आमच्या नेत्यांनी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी एखादी भूमिका मांडतात किंवा मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहितात त्यावेळी त्यांना ट्रोल करायला एक टोळी बसलेली आहे. त्यांनी धान्य वाटपाचा मुद्दा उपस्थित केला किंवा नायर हॉस्पिटलबाबतचा मुद्दा उपस्थित केला. परंतू याविषयावर बोलताना त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग केले जात आहे, असं अनिल चोले म्हणाले.
देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटायला गेले तर त्यावरूनही ट्रोलिंग केलं जात आहे. वास्तविक राज्यपालांना भेटण्याचा अधिकार त्यांना आहे. राजकीय हेतूपोटी त्यांना ट्रोल करायला एक टोळी बसली आहे, असंही चोले म्हणाले.