फडणवीसांचा राज्यात अस्थिरता माजवण्याचा कट – बाळासाहेब थोरात

0
265

फडणवीसांचा राज्यात अस्थिरता माजवण्याचा कट – बाळासाहेब थोरात

ग्लोबल न्यूज: राज्य सरकार सध्या कोरोनाच्या संकटाशी लढत असताना विरोशी पक्षाने आपली खुरापती चालूच ठेवल्या आहे. दोनच दिवसापूर्वी राज्यांचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी राज्यपाल भागासिंग कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकार विरोधात पत्र दिले होते. मात्र आता विरोधी पक्षाच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते एकत्र मिळून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. त्यांनी एका प्रसिद्ध वृत्त समूहाला दिलेल्या मुलाखतीत आपल मत मांडले होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार आगपाखड केली.

बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, राज्य कोरोनाच्या संकटात असताना भाजपला राजकारण सुचत आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा दिलेला सल्ला या कटाचा भाग असल्याचा दावा थोरात यांनी केला. एकीकडे भाजपचे नेते राजकारण करायचे नाही, म्हणून सांगतात.

पण देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते सातत्याने सरकार अडचणीत कसे येईल, हे पाहत आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.आज राज्यावर संकट आले असताना त्याला सामोरे जायचे सोडून भाजप राजकारण करु पाहत आहे. भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही आहे. ‘महाराष्ट्र बचाव’ नव्हे तर ‘भाजप बचाव’ अशी त्यांची भूमिका असल्याची टीका थोरात यांनी केली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur