पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या नवीन दर..

0
428

ग्लोबल न्यूज; देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. सोमवारी सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 60 पैशांनी वाढ झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी लॉकडाउनच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ दरात कोणताही बदल केला नव्हता.

मात्र रविवारी तेल कंपन्यांनी 83 दिवसांच्या अंतरानंतर किंमतींचा आढावा घेतल्यानंतर प्रतिलिटरमध्ये 60 पैशांची वाढ केली आहे. अशा प्रकारे सलग दुसर्‍या दिवशी किंमती वाढल्या आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, सोमवारी मुंबई पेट्रोलचे दर अनुक्रमे 74.35, 79.49 आणि 76.60 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. तसेच डिझेलचे दर अनुक्रमे 66.61, 69.37 आणि 69.25 रुपये प्रति लिटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याचा फायदा घेण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 3 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर किंमतींची समीक्षा थांबविण्यात आली. मे महिन्यात सरकारने पुन्हा पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये आणि डिझेलमध्ये 13 रुपये प्रतिलिटर वाढ केली.

Best IT Comany In Maharashtra , Solapur