पुण्यात धोका वाढतोय ! 24 तासांत 5 कोरोना मृत्यू ; 72 नवे रुग्ण

0
257

ग्लोबल न्यूज : पुणेकरांची चिंता वाढविणारी बातमी हाती आली आहे. पुणे शहरात गेल्या 24 तासांत कोरोनाने 5 बळी घेतले आहेत. एकूण 72 रुग्णांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज एकूण 6 रुग्ण कोरोनमुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या पुणे महापालिका हद्दीत 902 सक्रिय तर 1139 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. मृत्यू झालेल्या पाच रुग्णांपैकी तिघेजण 60 वर्षांपुढील तर दोघेजण 60 वर्षांखालील आहेत.

पुणे महापालिकेचे वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद पाटील यांनी ही माहिती दिली. आज नायडूसह अन्य कोविड केंद्र असलेल्या रुग्णालयात 367 कोरोना संशयित रुग्ण दाखल झाले. त्यातील 72 जणांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले. यापैकी 61 रुग्ण नायडूसह महापालिका रुग्णालयाने तर 11 रुग्ण अन्य खासगी रुग्णांलयात उपचार घेत आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

सध्या एकूण 768 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण विविध रुग्णांलयांमध्ये उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी 44 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पुणे महापालिका हद्दीत 902 सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यू झालेल्या पाच रुग्णांपैकी तिघेजण 60 वर्षांपुढील तर दोघेजण 60 वर्षांखालील वयोगटातील असून, हे सर्व जण पुरुष आहेत. यामधील दोघांचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात व तिघांचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. मृतांपैकी येरवडा येथील 51 वर्षीय पुरुष रुग्णाला 24 एप्रिलला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी त्यांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला होता. गणेशपेठ येथील 77 वर्षीय पुरुष रुग्णाला 25 एप्रिलला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला व ते पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले.

तर हडपसर येथील 66 वर्षीय पुरुष रुग्णाला 24 एप्रिल ससूनमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. आज ( रविवारी) त्यांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला. 24 एप्रिलला ससूनमध्ये दाखल केलेल्या 65 वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला असून त्यांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

तर कोंढवा येथे राहणाऱ्या 40 वर्षीय पुरुष रुग्णाला 22 एप्रिलला ससूनमध्ये दाखल करण्यात आले. त्याचाही कोरोनाचे निदान होऊन मृत्यू झाल्याचे पुणे महापालिका वैद्यकीय विभागाकडून कळविण्यात आले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur