पुणे मनपा सत्ताधारी भाजपाला अजित पवारांचा दणका…!
ग्लोबल न्यूज : महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षातीचे शितयुद्ध सर्वश्रुत आहे. आता हे शीतयुद्ध महानगर पालिकेपर्यंत पोहोचले आहेत. आता पुणे शहरातील ३२३ अरुंद रस्ते प्रत्येकी नऊ मीटर रुंद करण्याच्या सत्ताधारी भाजपच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर सहा मीटर रस्त्यावर टीडीआर वापरण्यासाठी बंधने उठवण्यात आली आहेत.


रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड मीटर सोडाव्या लागणार्या साईट मर्जिंनमध्ये सूट देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. पुणे शहरातील ३२३ अरुंद रस्ते नऊ मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. स्थायी समितीतील बहुमताच्या जोरावर भाजपने हा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आरोप होता.
काही बांधकाम व्यावसायिकांच्या हिताचा हा प्रस्ताव असल्याचा दावा महाविकास आघाडीने केला होता. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रस्तावास विरोध केला होता. या प्रकरणी पालकमंत्री अजित पवार यांनीही बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका असे निर्देश दिले होते.