पुणे-उस्मानाबाद-लातूर इंटरसिटी सुरू करावी खा. ओम राजेनिंबाळकर यांची लोकसभेत मागणी

    0
    276

    उस्मानाबाद: पुणे-उस्मानाबाद-लातूर इंटरसिटी सुरू करावी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची लोकसभेत मागणी

    उस्मानाबाद : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मागणीनुसार 2014 साली घोषीत केलेल्या उस्मानाबाद- तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाईनच्या कामास गती मिळण्यासाठी एक नोडल अधिकारी नेमुन संबधित रेल्वे विभागास रेल्वे लाईनचे काम जलदगतीने करावे यासाठी सुचना देण्यात याव्यात.

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    उस्मानाबाद जिल्हयातून धावणारी लातूर-मुंबई अशी एकच रेल्वे गाडी आहे. लातूर जिल्हयातूनच सदरची रेल्वेगाडी प्रवाशांनी पुर्णपणे भरून येते, त्यामुळे उस्मानाबाद जिल्हयातील प्रवाशांना जागा उपलब्ध होत नाही. मोठया प्रमाणात प्रवाशांची संख्या असताना देखिल पुणे किंवा मुंबईला ये-जा करण्यासाठी रेल्वेगाडया मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे रेल्वेच्या अर्थसंकल्पीय चर्चेच्या माध्यमातून संसदेत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पुणे उस्मानाबाद लातूर इंटरसिटी सुरू करावी अशी मागणी मा. रेल्वे राज्यमंत्री यांना केली.


    त्याचप्रमाणे कळंब रोड स्टेशन किंवा ढोकी स्टेशन रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडयांना थांबा देण्यात यावा अशी देखील यावेळी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे उस्मानाबाद ​रेल्वे स्थानकावर रॅक पाईंट उपलब्ध असून प्लॅटफॉर्म व आवश्यक शेड उपलब्ध करून देण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वेच्या अर्थसंकल्पीय चर्चेच्या माध्यमातून संसदेत मांडल्या.

    Best IT Comany In Maharashtra , Solapur