पीएनजी ज्वेलर्स बार्शी शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
बार्शी :
येथील पीएनजी ज्चेलर्सच्या बार्शी शाखेचा वर्धापन दिन ग्राहक व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहकांचा विश्वास जपत, उत्तम सेवा देत सुरू असलेल्या या वाटचालीस मान्यवरांनी व ग्राहकांनी शुभेच्छा दिल्या.

पानखुंट, ऐनापूर मारूती रोडवरील पीएनजीच्या सुवर्णपेढीत झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, तहसीलदार प्रदीप शेलार, यशोदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरूण बारबोले, प्रभाकर देशपांडे, भगवंत देवस्थान ट्रस्टचे सरपंच दादासाहेब बुडूख, गिरीश देशपांडे यांच्या हस्ते प्रथम वर्धापनानिमीत्त केक कापण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, कॅन्सर हॉस्पीटलचे खजिनदार बन्सीधर शुक्ला, रवी फाऊंडेशनचे संचालक मधुकर डोईफोडे, पीएनजी शाखेचे एरिया मॅनेजर शशांक बरीदे, फँचाईसी ओनर भाग्यश्री देशपांडे, ईश्वरी देशपांडे, वैभवी देशपांडे, रवी करवा, प्रदीप तातेड, गौतम कांकरिया, मातृभूमी प्रतिष्ठानचे प्रताप जगदाळे, मुरलीधर चव्हाण, प्रदिप बागमार, इंजि. असो. अध्यक्ष अभियंता गणेश तांबे, अमित इंगोले आदी उपस्थित होते.

यावेळी गिरीश देशपांडे म्हणाले, पीएनजी ज्वेलर्स या पेढीच्या माध्यमातून वर्षभरात पैंजण, मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन केले. हे महोत्सव ग्राहकांना आवडले. ग्राहकांना नाविण्यपूर्ण डिझाईन्स देण्यासाठी पीएनजी ज्वेलर्स नेहमीच प्रयत्नशील राहिले. यापुढेही अशा विविध उपक्रमांचे आयोजन करून ग्राहकाभिमुख सेवा ही सुवर्णपेढी देत राहील असा विश्वास व्यक्त केला.
शाखेचे मॅनेजर कैलास तारकसबंद म्हणाले, प्रथम वर्धापनानिमीत्त सोन्याच्या दागिन्यांची घडणावळ प्रतिग्रॅम २०२ रूपये पासून सुरू व हिऱ्यांच्या दागिन्यांची घडणावळीवर ५० टक्के पर्यंत सूट देण्यात आली आहे. २० फेब्रुवारी ते ९ मार्च २०२० या कालावधीत ही विशेष सवलत असणार आहे. तसेच २९ फेब्रुवारी ते १ मार्च २०२० या कालावधीत हिऱ्यांच्या वैविध्यपूर्ण दागिन्यांचं अनोखं प्रदर्शनही बार्शी शाखेत आयोजित करण्यात आले असल्याचे सांगितले. पीएनजी बार्शी शाखेतील कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
