पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त साहेबराव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

0
297

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त साहेबराव गायकवाड यांचे आज (गुरुवारी) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने पुण्यात निधन झाले आहे. ते 52 वर्षाचे होते. त्यांची 30 एप्रिल रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारीपदावरुन पिंपरी महापालिकेत अतिरिक्त (अप्पर) आयुक्त म्हणून बदली झाली होती. महापालिकेत ते रुजूही झाले नव्हते.

त्यानी उत्तर सोलापूरचे माजी तहसीलदार, विविध ठिकाणी उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेले होते. ते मुळचे रिधोरे(माढा) येथील रहिवासी तर ब्रम्हपुरी(मंगळवेढा) चे जावई आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

साहेबराव गायकवाड हे माढा तालुक्यातील रिधोरे गावचे सुपुत्र होते. त्यांनी काही काळ माढ्याचे तहसीलदार तसेच सोलापूर चे प्रांताधिकारी म्हणून देखील काम केलं होतं.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली होती .अद्याप त्यांनी हा पदभार स्वीकारला नव्हता. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी पदावरून त्यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची बदली झाली होती. दरम्यान गायकवाड यांनी आठ वर्षांपूर्वी पिंपरी महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून काम केले होते.

Best IT Comany In Maharashtra , Solapur