पावसाळ्यापूर्वी कोरोनाचे संकट संपवायचे आहे – मुख्यमंत्री
आक्की बर्वे
महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी मला महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट मला पावसाळ्यापूर्वी संपवायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचे नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


“जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्ष. त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की हे संकंट पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे त्यापूर्वी संपवायला पाहिजे. जून महिना सुरु केल्यानंतर शाळा कॉलेज सर्व सुरु करायच,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
मला कोणत्याही परिस्थिती शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही. ते वाया जाऊ देऊ शकत नाही. त्यामुळे शाळा कशा सुरु करायचं, त्याच्या खबरदारी काय घ्यायची. शाळा, कॉलेजमध्ये अॅडमिशन करायच्या. कुठे काय करायचं याचा विचार सुरु आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
“कोरोनासोबत जगायला शिका असं म्हटलं जात आहे. आमची कोरोनासोबत जगायची तयारी आहे, पण त्याची तयारी आहे का आम्हाला जगू द्यायची,” असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.