पालघर हत्या प्रकरणाची कसून तपासणी होईल, कोणीही धर्माचं राजकारण करु नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
285

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालघर येथील मॉब लिचिंग प्रकरणावर भाष्य केलं आहे. पालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद असं ते म्हणाले. ‘साधू आणि त्यांच्या चालकाची निघृण हत्या झाली. निर्जण आणि दुर्गम परिसरामध्ये हे गाव आहे. घटना घडताच आपले एसपी तिथे पोहोचले. 16 तारखेला ही घटना घडल्यानंतर 17 तारखेला आरोपींना अटक केली. मुख्य 5 आरोपीही तुरुंगामध्ये आहेत. या प्रकरणातील कोणालाच सोडणार नाही. कोणी आग लावण्याचा प्रयत्न करू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. 

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पालघर जिल्ह्याच्या टोकाला दादरा-नगर हवेलीच्या सीमेवर एक दुर्दैवी प्रकार घडला. या काळात सर्वांनी माणुसकी ठेवण्याची आवश्यकता आहे. केंद्र शासित प्रदेशात त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. गडचिंचली हे गाव तिथे जायला नीट रस्ता नाही. या घटनेनंतर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यासोबतच दोन पोलिसांनीही निलंबित केलं आहे. आरोपींना शोधून काढणार शिक्षा करणार. हा धार्मिक हिंसाचार नाही, अफवेमुळे प्रकार घडला असल्याची माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, घटना घडल्याच्या काही वेळातच पोलीस तेथे पोहोचले. पहाटे पाच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना पकडलं. आम्ही कारवाई केलेली आहे या प्रकरणावरुन राजकारण करु नका असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. जे लोक धर्माचं राजकारण करत आहेत त्यांनी ते करु नये. मी या घटनेत जात-पात-धर्म पाहिला नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. पालघर प्रकरणात 100 पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. यामध्ये नऊ मुलं अल्पवयीन आहेत त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणातल्या पाच म्होरक्यांनाही अटक केली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Best IT Comany In Maharashtra , Solapur