पदाची मर्यादा राखा, केंद्रीय मंत्र्याला शोभत नाही – पृथ्वीराज चव्हाण

0
298

पदाची मर्यादा राखा, केंद्रीय मंत्र्याला शोभत नाही – पृथ्वीराज चव्हाण

ग्लोबल न्यूज: परप्रांतीय मजुरांना आपआपल्या जिल्ह्यात सोडण्याच्या वादावरून आता महाविकास आघाडीचे नेते आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यात चांगलाच शब्दीक वाद सुरू झालेला दिसून येत आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही उडी घेतली आहे. “रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पदाची मर्यादा तरी राखली पाहिजे, केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का?” असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्यांना दिला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशी भाषा करु नये. त्यांना रोजगार निर्माण करता आला नाही म्हणून हे लोक महाराष्ट्रात आले. त्यांची राज्यात काळजी घेतली गेली. पण असे आरोप करुन उत्तर मिळणार नाही,” असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहे.

“माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बजेटवर पुस्तक लिहिले आहे. त्यांना याबाबत अधिक माहिती आहे की राज्य सरकार कधीही पॅकेज देत नाही. केंद्र सरकार देत असते. राजकारणासाठी मागणी करत असाल, तर ठीक आहे. उद्या म्हणाल की मुंबई महापालिका आणि नागपूर महापालिकेने काय पॅकेज जाहीर केले आहे असा टोलाही पृथ्वीराज चव्हाणांनी फडनवीसांना लगावला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur