पत्रकार मारुती बावडे यांना राज्य शासनाचा पुरस्कार प्रदान
अक्कलकोट: महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, सोलापूर यांच्या मार्फत देण्यात येणारा राजमाता जिजाऊ स्वावलंबन तालुकास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक संचारचे तालुका प्रतिनिधी मारुती बावडे यांना आज (सोमवारी) समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

हा कार्यक्रम सोलापूर येथील वोरोनोको प्रशालेच्या प्रांगणात पार पडला. यावेळी जि. प.अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,उपाध्यक्ष दिलीप चव्हाण,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ,प्रकल्प संचालक अनिलकुमार नेवाळे, जि. प.सदस्य आनंद तानवडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.