नो सेलिब्रेशन ! चिमुकल्या ईश्वरीच्या वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला

0
288

नो सेलिब्रेशन ! चिमुकल्या ईश्वरीच्या वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीला

बार्शी – शहरातील ईश्वरी प्रतीक गलांडे या चिमुकलीच्या वाढदिवसाचा संपुर्ण खर्च अकरा हजार एकशे अकरा रुपये मुख्यमंत्री सहायता निधी कोव्हीड19 साठी निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन गलांडे कुटुंबाने संपुर्ण खर्च मुख्यमंत्री निधीला देण्याची भूमिका घेऊन बार्शी निवासी नायब तहसीलदार मुंढे यांच्याशी संपर्क साधला.त्यावेळी, मुंढे यांनी या भूमिकेचे कौतुक करून प्रशासकीय सोपस्कर विसरून गलांडे यांच्या घरी जाऊन निधीचा धनादेश स्वीकारला. तसेच, तालुका प्रशासनाच्यावतीने ईश्वरीला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

आपल्या कुटुंबातील लहानग्या, चिमुकल्या बाळाचा वाढदिवस म्हणजे सर्वांसाठी आनंदाचा क्षण असतो. आई-वडिलांकडून तर 2-4 महिन्यांपासून या बर्थडे सेलिब्रेशनच प्लॅनिंग सुरू असतं. नातेवाईक, मित्रकंपनी, शेजारी-पाजारी आप्तेष्ठांना बोलावून धुमधडाक्यात हा बर्थडे साजरा होतो.

मात्र, प्रतीक गलांडे यांनी सद्यपरिस्थीचे भान ठेऊन आणि कोरोनाच्या लढाईतील आपली सामाजिक बांधिलकी जपत मुलगी ईश्वरीच्या वाढदिवसाचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्त केला. चिमुकल्या ईश्वरीने हा चेक नायब तहसीलदार मुंढे यांच्याकडे दिला. यावेळी, ईश्वरीचे अन तिच्या कुटुंबियांचे मुंढे यांनी कौतुक केले.

दरम्यान, यावेळी अवल कारकून विरेश कडगंची, विरोधीपक्ष नेते नागेश अक्कलकोटे, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष राजकुमार पुजारी, चंद्रकांत गलांडे , सौ मनीषा गलांडे , प्रतीक गलांडे , राजाभाऊ आगवणे उपस्थित होते

गलांडे परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चिमुकल्या ईश्वरीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा… !

Best IT Comany In Maharashtra , Solapur