ग्लोबल न्यूज: घरातल्या कुणाला जर कोरोनाची लागण झाली तर सरळ त्याला उचलून घेऊन जातात; जगला तर परत येतो, नाहीतर फक्त फोन करून सांगतात मेला म्हणून…
ना बॉडी बघायला मिळते ना कुठे जाळला हे कळते. सोबत आहोत तोपर्यंत प्रियजनांना वेळ देणं गरजेचं आहे, मनातलं सांगणं महत्वाचं आहे, सोबत राहणं गरजेचं आहे. प्रेम करा, माफी मागा, हट्ट पुरवा.. जमत नसेल तर जमवून ठेवायची वेळ आली आहे.

मना सारखा जोडीदार पाहण्यात आयुष्य निघून जाते. जागे व्हा. हि वेळ परत नाही.. अॅडजस्ट करायला शिका.. पाहिलं ना एक कोरोना आला आणि अखं जग ठप्प झालं.. विचार करायला वेळ मिळेल कि नाही सांगता येत नाही,
कारण कदाचित Second Chance मिळणार नाही.
पैसा सर्वस्व नाही:
कितीही पैसे असतील तरी तुम्ही काही गोष्टी विकत नाही घेऊ शकत. आरोग्य, समाधान, दृष्टिकोन आणि विचार अशा गोष्टी विकत नाही मिळत. त्या कमवाव्या लागतात. आज सगळ्यांना सरकारी दवाखान्यातच दाखल करतायत. नो स्पेशल ट्रीटमेंट… जरी पैसे खुप असतील तुमच्याकडे, पण रिसोर्सेस हे समाजाचे असतात हे नेहमी लक्षात ठेवा.

वर्तमानात जागा:

आजचा दिवस उद्याच्या चिंतेत वाया घालवणे हे चुकीचेच आहे. भविष्याचे नियोजन असणे गरजेचे, पण त्याचा दबाव वर्तमानावर नको. वर्तमान आनंदात घालवणे खूप महत्वाचे..
क्या पता ” कल हो ना हो…
विचार करा !”
नाना पाटेकर यांच्या नावाने हा मेसेज फिरत आहे. नेमका कोणी लिहिला हे माहीत नाही
किती दिवस असं घरी बसायचं?. कंटाळलो आता! आणि मेलो म्हणून झालं काय? इतके दिवस घरी बसल्यानंतर असे विचार जर तुमच्या मनात येऊन गेले असतील. तर ही दृश्य बघा. कोरोना होतो.. तुम्ही मरण पावता. म्हणजे नेमकं काय होतं. याचा अंदाज येईल.

आपल्या नात्या गोत्यात नसलेली माणसं, आपला मृतदेह भीतीच्या छायेत हाती घेतात. कुणाच्या रडण्याचा आवाज नसतो. की कुणी आपलं माणसू गेल्याच्या भावनेने फोडलेला हंबरडा नसतो. असते ती एक भयाण शांतता.
जीवाभावाची माणसं अंत्यसंस्कारासाठी धजावत नसताना, हे योद्धे…जात, धर्म, वगैरे सगळं सगळं विसरुन शेवटच्या प्रवासात सोबती होतायत… पण आपलं माणूस या अखेरच्या प्रवासात सोबत नाहीये… याची खंत भरुन निघेल..? आपण आपल्या माणसाला खांदा देऊ शकलो नाही… याची सल खरंच संपेल..?

आपला अखेरचा प्रवास हा असा होऊ नये, असं वाटत असेल, तर घरीच थांबा. माणूस म्हणून जन्म घेतलाय.. तेव्हा कधीतरी मरण येणार हे निश्चित आहे. मृत्यू… मग तो कुणाचाही असो… वाईटच… पण शेवटचा प्रवास सुरू असताना आपल्या जवळच्या माणसांच्या डोळ्यात दु:खाऐवजी भीती असणं केवळं दुर्दैव. म्हणून संयम राखायला हवाय. घरात बसायला हवंय. आपल्यासाठीही आणि आपल्या जवळच्या माणसांसाठीही…