निस्वार्थपणे वैदयकिय सेवा करणाऱ्या खऱ्याखुऱ्या भगवंताला बार्शीकर आज मुकले-आमदार राजेंद्र राऊत

  0
  543

  डॉ. भगवान नेने यांच्या निधनाने बार्शीच नव्हे तर राज्य पातळीवर वैदयकिय क्षेत्रात पोफळी निर्माण झाली आहे त्यांनी स्थापन केलेल्या बार्शीतील कैन्सर हॉस्पीटल मुळे ४ते ५ जिल्हयातील रुग्नांची सोय झाली निस्वार्थपणे वैदयकिय सेवा करणाऱ्या खऱ्याखुऱ्या भगवंताला बार्शीकर आज मुकले आहेत अशी भावना आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली.

  बार्शी: बार्शीतील जगप्रसिध्द नर्गिस दत्त मेमेरियल कॅन्सर हॉस्िपटलचे संस्थापक चेअरमन डॉ़ भगवान उर्फ शरद महादेव नेने यांचे वृध्दापकाळाने पुणे येथे उपचार सुरु असताना निधन झाले़त्यांचे वय ८० वर्षे होते़ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली,जावई असा
  परिवार आहे़ डॉ़ नेने यांना फुफुसाचा आजार होता़ त्यांना दम लागत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्िपटलमध्ये उपचार सुरु होते़ अखेर आज सायंकाळी साडेसहा
  वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

  आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

  त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १०४० रोजी मिरज येथे झाला़ सेंट झेव्हियर्स कॉलेज मुंबई येथे इंटरसायन्स पुर्ण केल्यानंतर वैद्यकीय शिक्षण ग्रँन्ट मेडिकल व
  जे़जे़ हॉस्पिटल मुंबई येथे घेऊन १९६२ साली वैद्यकीय पदवी मिळवली़तर पुढे एम़डी़ मेडिसीन ही पदवी प्राप्त केली़१९७१ मध्ये लंडन येथे एमआरसीपी ही वैद्यकीय शिक्षणातील उच्च पदवी घेतली.

  Best IT Comany In Maharashtra , Solapur

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here