निलेश राणे यांच्या फोटो वरून केले जात आहे त्यांनाच ट्रोल

0
251

निलेश राणे यांच्या फोटो वरून केले जात आहे त्यांनाच ट्रोल

ग्लोबल न्यूज: भाजपाचे नेते निलेश राणे हे ट्विटवर प्रचंड अ‍ॅक्टीव्ह असतात तसेच महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयावर ते आपले मत प्रकट करत असतात.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

तसेच अनेक घडामोडींवर ते ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना दिसतात. अनेकदा ते राज्य सरकारवर आणि खास करुन शिवसेनेवर व त्यांच्या नेत्यांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका करताना दिसतात.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो किंवा शिवसेनेचे खासदार संजय राऊत असो निलेश राणे ट्विटवरुन सर्वांबद्दलच बोलताना दिसतात. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवरही अनेक बातम्यांवर निलेश राणे ट्विटरच्या माध्यमातून आपले मत मांडताना दिसतात.

ट्विटरमुळे निलेश राणे बातम्यांमध्येही कायम चर्चेत असतात. मात्र सोमवारी त्यांनी पोस्ट केलेल्या एका फोटोवर त्यांनाच अनेकांनी ट्रोल केलं आहे.

प्रकरण असे की, की निलेश राणे यांनी एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये एका रिक्षात तीन माकडे बसल्याचे चित्र दिसत आहे.

यापैकी एका माकडाच्या हाती रिक्षाचे हॅण्डल आहे तर दुसरी दोन माकडे मागे बसलेली दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करताना निलेश राणे यांनी, “तिघ बसलेत पण चालवायला तिघांना येत नाही” अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोच्या माध्यमातून राणे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे मात्र ह्याच फोटॊ वरून राणे यांना ट्रोल केले जात आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur