निलेश राणे आणि रोहित पवार यांचा वाद आणखी चिघळणार वाचा……!
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषेत उत्तर दिले आहे. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.
त्यामुळे काळजी नसावी असा खमखमीत टोला रोहित पवार यांनी लगावला आहे. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. यावरुन निलेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली होती.


साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे. साखर कारखाने कोट्यवधींची उलाढाल करतात. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोंनवर्षे साथ देत आलेत. तरी वाचवा?,” असे म्हणत राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

मात्र आता निलेश राणे आणि रोहीत पवार यांच्यात कमालीचे युद्ध पेटलं आहे. रोहित पवार यांच्या उत्तरावर निलेश राणे यांनी अतिशय आक्रमकपणे हल्ला चढवला आहे. ‘मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी.’ असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

तर, हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे?? ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय. अशी घणाघाती टीका देखील निलेश राणे यांनी केली आहे.
