निराधारांच्या अंत्यसंस्कारासाठी धाऊन आले आमदार आंबदास दानवे
सुरज गायकवाड
ग्लोबल न्यूज: सध्या कोरोनाच्या संसर्गाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. त्यातच आता राज्य सरकाने 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊन मध्ये सर्वत्र शांतता असताना संभाजीनगर शहरात धर्मेश पवार या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, मात्र कोरोनाच्या धास्तीने रक्तातला भाऊ सुद्धा अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नव्हता. त्यावेळी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी पुढे येऊन सदर पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. त्याचबरोबर मुखाग्नीही त्यांनी स्वतः दिली. आज वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आमदार आंबदास दानवे यांच्या वागणुकीतून दिसून येत होती.


संभाजी नगरातील सिडको येथील हॉटेल मध्ये दोन दिवसापासून मृत्यू पावलेल्या प्रदीप पवार या कामगारांच्या मृतदेहाशी रक्ताचे नाते सांगणारा मोठा भाऊ संदीप पवार आणि चुलता नारायण पवार यांनी पाठ फिरवली होती. प्रदीप पवार यांच्या पार्थिवावर असमर्थता दाखवलेली असताना जिल्हा प्रमुख तथा आमदार आंबदास दानवे यांनी वृत्तपत्रातील वृत्त वाचल्यानंतर सिडकोतील पोलीस निरीक्षक गिरी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेत परिस्थितीचा आढावा घेतला.
यानंतर आमदार आंबदास दानवे यांनी प्रदीप पवार यांचा मृतदेह घेण्यासाठी कुटुंबातील कोणीही व्यक्ती समोर येत नसल्याचे लक्षात आल्यावर कामगाराच्या मृत्यूवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला व स्वतः कैलासनगर येथील स्मशानभूमीत कामगारावर अंत्यसंस्कार केले व मुखाग्नी दिली.
