नालेसफाईवर शेलारांचा मुंबई मनपाला टोला, म्हणाले ही तर हातसफाई

0
403

नालेसफाईवर शेलारांचा मुंबई मनपाला टोला, म्हणाले ही तर हातसफाई

मुंबईत पाऊस सुरू होण्यापूर्वी बृहमुंबई महानगर पालिकेच्या सफाई खात्याकडून गटारे, नाले साफ करण्याची मोठी मोहीम गती घेण्यात येते. पावसाचं पाणी तुंबणार नाही, याची पूर्वतयारी म्हणून महापालिकेकडून ही उपाययोजना केली जाते. यंदाही नालेसफाईचं काम झाल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. मात्र, भाजपाचे नेते तथा आमदार आशिष शेलार यांनी नालेसफाईवरून महापालिकेला धारेवर धरलं आहे. “टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची हातसफाई वर्षानुवर्षे सुरू आहे” असा टोला हाणत शेलार यांनी मनपाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पावसाळ्याला सुरूवात होण्याआधी मुंबईत नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. पावसाचं पाणी तुंबणार नाही, याची पूर्वतयारी म्हणून महापालिकेकडून ही उपाययोजना केली जाते. यंदाही नालेसफाईचं काम झाल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. मात्र, भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी नालेसफाईवरून महापालिकेला धारेवर धरलं आहे. “टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची हातसफाई वर्षानुवर्षे सुरू आहे” असं शेलार यांनी अनेक प्रश्न केले आहेत.

पावसाळा सुरू झाला आहे. अद्याप मुंबईत पाऊस दाखल झालेला नसला तरी नालेसफाईचं काम महापालिकेकडून पूर्ण झाले असल्याचा दावा केला जात आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी नालेसफाई बाबत केलेल्या दाव्यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केले असून, त्यात नालेसफाईबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाईच्या आकडेवारीचा ‘डोंगर’ उभा केला जातो. आयुक्त मोठमोठे दावे करतात आणि पहिल्याच पावसात सगळे दावे वाहून जातात. नव्या आयुक्तांनी यावर्षी ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीची ‘हातसफाई’ वर्षानुवर्षे सुरू आहे,” असं शेलार यांनी म्हटलं आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here