नागठणा येथील शिवाचार्य महाराज यांचा अज्ञात व्यक्तीने केला खून, एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी दोन हत्या

0
261

नागठणा येथील शिवाचार्य महाराज यांचा अज्ञात व्यक्तीने केला खून, एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी दोन हत्या


उमरी : नागठाणा येथे काळीमा फासणारी घटना. एकाच रात्री वेगवेगळ्या ठिकाणी दोन खून. तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास खून झाला असून या घटनेने भाविकात एकच खळबळ उडाली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली.

महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली.लगेच महाराजांचे प्रेत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून याठिकाणी भाविकांना ही माहिती समजताच एकच खळबळ माजली.

नागठाणा बु. येथील मठामध्ये अन्य एकाचा मृतदेह सापडला

नागठाणा बु.ता. उमरी येथील ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला असून मयताचे नाव भगवान शिंदे रा.चिंचाळा ता. उमरी असे असल्याचे समजते. घटनास्थळी उमरी पोलिस स्वाना झाले असून याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम चालू आहे.

या घटनेने उमरी तालुक्यासह जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासन पुढील तपास करत आहेत. स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्ते यांनी या घटनेचा निषेध नोंदविला आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur