नवजात बाळाच्या मातेने CMOला टॅग करताच आदित्य ठाकरेंनी घेतली दखल; तत्काळ दिली घरपोच सेवा

0
278

मुंबई :- आपल्याकडे बाळाच्या जन्मापूर्वी कपडे, खेळणी घेत नाहीत. लॉकडाऊनमध्ये जन्माला आलेल्या बाळांना जन्मानंतर पुरेसे कपडे आणि इतर अत्यावश्यक गोष्टी मिळणे गरजेचे आहे. किमान लहान बाळासंबंधी वस्तूंचा पुरवठा नियमित करावा, असे ट्विट मीरा अंबरकर या नवजात बाळाच्या आईने केले होते. या ट्विटला त्यांनी CMOला टॅग केले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तत्काळ या ट्विटची दखल घेतली व अंबरकर यांची अडचण लक्षात घेऊन कार्यालयाकडून लगेच त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यात आली.

“मी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या कार्यालयातून बोलतोय. आपली पोस्ट आमच्यापर्यंत पोहचली आहे. आपली अडचण आम्हाला कळली. आदित्य ठाकरे यांनी आपल्याला तत्काळ फोन करून आपली पूर्ण माहिती मागवण्यास सांगितली. त्यामुळे आपला संपूर्ण पत्ता आम्हाला द्या. आपल्याला तत्काळ मदत पोहचवल्या जाईल.” या फोननंतर काही वेळातच आदित्य ठाकरेंच्या कार्यालयातील एक गृहस्थ चक्क बेबीशॉपकिपरलाच घरी घेऊन आले आणि माझ्या बाळासाठी हव्या असलेल्या सर्व वस्तू तत्काळ माझ्या घरी पोहचल्या.
हा अनुभव सांगितलाय मुंबईतील मीरा एस. अंबरकर या नवजात बाळाच्या आईने.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मीरा एस. अंबरकर सांगतात की, मी आज सकाळी माझी अडचण काही मैत्रिणींना सांगितली आणि त्यांनी मला ट्विटरवर मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग करण्याचा सल्ला दिला. माझा विश्वास बसत नाहीये की, cmoला मी टॅग केल्यानंतर काही वेळातच माझ्या ट्विटची दखल घेऊन मला घरपोच मदत मिळाली आहे. तसेच, लॉकडाऊनमध्ये आम्ही लहान बाळांच्या उपयोगी वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्याचा विचार केला; मात्र, काही लोकांच्या अतिरेक करण्यामुळे तसे करू शकत नाही. आपल्याला अजून काही मदत लागल्यास निःसंकोच सांगा, ती घरपोच पोहचवू, असेही आदित्य ठाकरे कार्यालयाकडून सांगण्यात आले असल्याची माहिती अंबरकर यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील १४ दिवसांपासून देश लॉकाडाऊन आहे. किराणा, धान्य, फळ, भाज्या याव्यतिरिक्त सर्व दुकाने कटाक्षानं बंद ठेवण्यात आली आहेत.

लॉकडाऊनमध्ये जन्माला आलेल्या बाळांना जन्मानंतर पुरेसे कपडे आणि इतर अत्यावश्यक गोष्टी मिळणे गरजेचे आहे. किमान लहान बाळासंबंधी वस्तूंचा पुरवठा नियमित करावा. अशीच मागणी चंद्रपूरच्या एका नवजात मातेनेदेखील केली आहे.

राज्यात दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. विशेषतः मुंबईत ही संख्या अधिक दिसून येते आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील काही भाग ‘रिस्ट्रिक्ट’ केला गेला आहे. त्यातच आता ‘न्यू बॉर्न बेबी शॉप’ उघडे ठेवण्याची मागणी होताना दिसत आहे. यावरही ठाकरेंनी तोडगा काढला असून न्यू बॉर्न बेबींसाठीची अडचण लक्षात घेऊन मदत थेट त्या बाळाच्या घरापर्यंत पोहचवली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur