नगरपालिका शिक्षण मंडळ, बार्शी अंतर्गत आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धा;बाल कलाकारांच्या सादरीकरणाने पालकमंडळी खुश
बार्शी: यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनात दिनांक 27 जानेवारी 2020 रोजी बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळ अंतर्गत आंतरशालेय सांस्कृतिक स्पर्धात नगरपालिका शाळातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य सादरीकरण केले.

सदर स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले ,नगरसेवक ,प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, पर्यवेक्षक संजय पाटील, शिक्षण समिती सभापती रजिया बागवान, पाणीपुरवठा सभापती संतोष बारंगुळे, महिला बाल कल्याण समिती शोभा मोरे, नगरसेवक विजय चव्हाण, अमोल चव्हाण, सोनल होनमाणे, महेश जगताप, नवनाथ चांदणे, अलिशेर बागवान, भारत पवार उपस्थित होते.
नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देणेसाठी शिक्षण मंडळ सातत्याने प्रयत्न करते, सांस्कृतिक स्पर्धेत 285 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून स्पर्धा लहान गट व मोठा गट या दोन विभागात होत्या, तसेच पुढील आठवड्यात नगरपालिका शाळा अंतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. नगरपालिका बार्शी सदैव शिक्षण मंडळास विविध उपक्रमास पाठबळ देते असे प्रास्ताविकात प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांनी सांगितले.
नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी नगरपालिका शाळांना सर्वतोपरी मदत करू आश्वसित केले. तसेच उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांनी नगरपालिका शाळातील शिक्षक हे अतिशय चांगले काम करतात असे सांगितले.
आमदार राजाभाऊ राऊत यांनी शिक्षण मंडळ अंतर्गत शाळातील मागील शैक्षणिक वर्षापेक्षा या वर्षी मुलांची संख्या वाढली त्याबद्दल प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांचे विशेष कौतुक करून यावर्षी सर्व नगरपालिका शाळा अद्यावत करू असे आश्वासन दिले
तसेच त्यांनी शाळांची संख्यात्मक वाढ होत असताना गुणात्मक दर्जा खाजगी शाळांप्रमाणे सुधारणा करावी असे सांगितले.

स्पर्धेचे परीक्षण योगेश उपळकर, सुचिता मदने, पांडुरंग माने यांनी केले व परीक्षण करून कार्यक्रम खूप चांगला झाला त्यामध्ये समूह नृत्य लोक गीत, देशभक्तीपर गीत, भक्ती गीत अशा गीतांचा समावेश होता, असा अभिप्राय परीक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
स्पर्धा बक्षीस वितरण नगरपालिका बार्शी येथील सर्व उपस्थित नगरसेविका शिक्षण समिती सभापती रजिया बागवान, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, पर्यवेक्षक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर स्पर्धेत बक्षिसे मिळवली
मोठा गट
प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण नगरपालिका शाळा क्र.15 द्वितीय श्री भगवान महावीर नगरपालिका शाळा क्र.02, तृतीय क्र.राजर्षी शाहू महाराज नगरपालिका शाळा क्र.06, उत्तेजनार्थ शाहीर अमर शेख नगरपालिका शाळा क्र.11
लहान गट
प्रथम क्रमांक स्वातंत्र्यवीर सावरकर नगरपालिका शाळा क्र.03 द्वितीय क्र.राजमाता जिजाऊ नगरपालिका शाळा क्र 09 तृतीय क्र. नगरपालिका शाळा क्र 13 उत्तेजनार्थ नेताजी डॉ राधाकृष्णन नगरपालिका शाळा क्र.18 या शाळांनी यश संपादन केले, यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेत समूह गीत पंडित जवाहरलाल नेहरू नगरपालिका शाळा क्र 14 च्या मुलींनी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्षा रत्नप्रभा परचंडराव यांनी केले, सुरेश शिंदे यांनी बक्षिसे नियोजन केले, स्पर्धेतील समूह नृत्य गाणी नियोजन महेश नेवरे यांनी केले.
तसेच गाण्याचे सूत्रसंचलन दिनकर पाटील,सुलताना मुल्ला,विद्या कदम यांनी केले,सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी स्पर्धा समिती सदस्य संभाजी मुंढे,अर्जुन भोसले,रवी मिरगणे,अरुण उमाप, नाना पाटील,संजय गोरे ,अशोक सानप ,सज्जन मिरगणे ,अंगद मुकटे,वाजीद शेख ,शाकिर शेख ,रमेश वरे,भाऊसाहेब घाडगे , सुरेश जाधवर ,नागेश जाधवर ,ज्ञानेश्वर धस ,भाऊसाहेब घाडगे ,कार्यालयीन कर्मचारी चंद्रकांत नागणे, अशोक कांबळे, अनुपमा कोरफळकर, विनायक पैकीकरी, बलू माळी, रवी कदम, यांनी केले.स्पर्धेचे आभार प्रदर्शन मुख्यध्यापक दिवाकर कांबळे यांनी केले.