नकली नोट छपाई करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; एकुण ९ जणांना अटक , १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

    0
    273


    नकली नोट छपाई करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; एकुण ९ जणांना अटक , १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी

    आतापर्यंत ३ लाख ५४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त 

    आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

    बार्शी : दोन दिवसापुर्वी शेंद्रीफाट्यानजीक १०० रुपयाच्या बनावटी नोटा बाजारात खपवल्याप्रकरणी दोन आरोपीना अटक केल्यानंतर पोलिसानी वेगाने तपासाची चक्रे फिरवत याच टोळीतील आणखीन ७ संशयीत आरोपीना अटक करून नकली नोट छपाई करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे .

    टोळीतील ७ आरोपीना कोर्टासमोर उभे केले असता १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.यामुळे या प्रकणात एकूण ९ आरोपीची संख्या झाली आहे .अटकेतील संशयित पुणे, बीड व सोलापूर जिल्हयातील असल्याचे समोर आले आहे.

    रविवारी दुपारी दोघांना अटक केल्यानंतर रात्र उशीरा एक व सोमवारी सहा अशा आणखी सात जणांना याप्रकरणी पोलीसांनी अटक केली आहे. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. 

    पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहूल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाने उमेश भिकाजी साबळे (रा.वालचंदनगर ता इंदापूर जि.पुणे), मंगेश प्रल्हाद सोनवणे (रा.शेंद्री बुद्रूक ता. आष्टी जि.बीड) यांना ताब्यात घेवून नंतर अटक केली होती. त्यांच्याकडून १०० रूपये दराच्या १६५ बनावट भारतीय चलनी नोटा सापडल्या होत्या. पोलीसांनी सदरच्या दोघांकडे अधिक चौकशी केली


    गणेश सदाशिव केचे ( वय २४ ), विठ्ठल हनुमंत केचे (वय २६ ), सुनिल लहू केचे ( वय २२ ), अनिकेत राणासाहेब मुंजाळ ( वय २१ रा. सर्व उंबरे वे ता. माळशिरस जि.सोलापूर ), सागर सुरेश सुपे (वय २४ रा.साडे ता. करमाळा जि.सोलापूर ), शंकर विष्णू जाधव (वय २५ रा.महाळुंगे ता माळशिरस जि. सोलापूर )आकाश अरविंद पवार (वय २५ रा. महाळंगे )अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. 

    संशयित आरोपींकडून पोलीसांनी बनावट नोटांसह, प्रिंटर व बनावट नोटा, मोटारसायकल असा एकूण सुमारे ३ लाख ५४ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. दरम्यान, रविवार व सोमवारी अटक केलेल्या सात जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दि.१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश कुंभार तपास करत आहेत.

    या टोळीत एकूण ९ जण काम करत असुन त्यांनी या टोळीची दोन टिममध्ये विभागणी केली होती त्यापैकी एक टिम बनावटी नोटा छपाई करण्याचे काम करत असत तर दुसरी टिम गावातील आठवडे बाजार मंडई अशा ठिकाणी नकली १०० रुपयाच्या नोटा खपवित असल्याची माहिती समोर येत आहे .

    बजावटी नोटाच्या टोळीमध्ये उच्चशिक्षीत तरूण 

    या ९ आरोपीपैकी काही आरोपी उच्चशिक्षित असुन गेली सुमारे दोन वर्षापासुन संशयित आरोपी एकत्र येऊन लाखो रुपयांची नकली नोटाची छपाई करुन बाजारपेठात खपविल्या असाव्या असा संशय व्यक्त केला जात आहे 

    Best IT Comany In Maharashtra , Solapur