धारावीत 200 बेडचे कोरोना हॉस्पिटल अवघ्या 15 दिवसात तयार

0
276

धारावीत 200 बेडचे कोरोना हॉस्पिटल अवघ्या 15 दिवसात तयार

सध्या देशात आणि राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्यातच मुंबईची कोरोना रुग्ण संख्येत काही अंशतः वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे जर का येणाऱ्या दिवसात मुंबईत रुग्ण संख्या वाढली तर त्यासाठी आरोग्य यंत्रने सुसज्ज ठेवण्यात आली आहे याचं पार्श्वभूमीवर मुंबईतील घनदाट लोकवस्तीचा भाग असलेल्या धारावी येथील महाराष्ट्र नेचर पार्कजवळ ऑक्सिजन सुविधायुक्त 200 खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला नुकतंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भेट दिली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत उभारलेल्या या रुग्णालयात त्याच परिसरातील रुग्णांना उपचार घेता येणार आहे. आजपासून हे रुग्णालय सुरु होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे बऱ्याचदा श्वास रोखण्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. अशावेळी या रुग्णांना वेळीच ऑक्सिजनचा पुरवठा झाला तर त्यांचे प्राण वाचू शकतात.

तसेच स्थानिकांना त्या भागातच उपचाराची सोय व्हावी यासाठी मुंबई महापालिकेमार्फत धारावीतील बस डेपो जवळ हे कोरोना आरोग्य सेंटर सुरू करण्यात आले आहे. केवळ 15 दिवसांमध्ये 200 खाटांच्या रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.

यातील प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय आहे. त्यामुळे ज्या कोरोनाबाधित रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास जाणवत असले त्याला तात्काळ या सेंटरमध्ये ऑक्सिजन देऊन उपचार केले जातील.

Best IT Comany In Maharashtra , Solapur