धक्कादायक: सोलापुरात कोरोना बाधिताची संख्या 182 तर मृत संख्या झाली 11 आज 29 ची झाली वाढ

0
285

सोलापुरात कोरोना बाधिताची संख्या 182 तर मृत संख्या झाली 11

सोलापूर- सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या आता 182 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 11 इतकी झाली आहे. आजपर्यंत सोलापूरात एकूण 2775 जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आली. यातील 2495 जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात 2313 निगेटिव्ह तर 182 पॉझिटिव्ह आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा
?????????????????????????????????????????????????????????

आज एका दिवसात 126 अहवाल प्राप्त झाले यातील 97 अहवाल निगेटिव्ह तर 29 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 14 पुरूष, 15 महिलांचा समावेश आहे. यापैकी एक महिला उपचारादरम्यान मृत पावली. आज 5 जणांना बरं वाटू लागल्यानं घरी सोडण्यात आलं. तर केगांव येथून 24 जणांना घरी सोडण्यात आलं.

आज जे 29 रूग्ण मिळाले यात आकाशवाणी केंद्राजवळ 6 पुरूष, 6 महिला.

अलकुंटे चौकात 1 पुरूष, 1 महिला.

बापूजीनगर येथे 2 पुरूष, 2 महिला.

भारतरत्न इंदिरा नगर 1 पुरूष, 1 महिला.

नई जिंदगी 1 पुरूष, 3 महिला.

रंगभवन 1 पुरूष.

शनिवार पेठ 1 महिला.

रेल्वे लाईन 1 पुरूष.

न्यू पाच्छा पेठ 1 पुरूष, 1 महिला.
अशी वर्गवारी आहे.

आज जी महिला मृत पावली ती न्यू .पाच्छा पेठ परिसरातील असून वय 48 आहे. दिनांक 6 मे रोजी सिव्हील हॉस्पिटलमध्ये या महिलेस दाखल करण्यात आलं होतं. 6 मे रोजी दुपारी ती मृत पावली. आत्तापर्यंत मृतांची संख्या 11 झाली आहे. यात 5 पुरूष, 6 महिला असा समावेश आहे.

आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 182 जणांत 103 पुरूष तर 79 महिलांचा समावेश आहे. तर बरे झालेल्या एकूण व्यक्तींची संख्या 29 झाली आहे.

उद्या शुक्रवार पासून सोलापूर महानगरपालिकेचे सर्व कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू होणार आहे. यासंबधी 33% कर्मचारी उपस्थित राहतील असं नियोजन आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावं असे आदेश पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी आज काढले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खरेदी विक्री दस्त नोंदणीचे कामकाज उद्यापासून संबंधित कार्यालयात सुरू होईल. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत.

Best IT Comany In Maharashtra , Solapur