धक्कादायक: सोलापुरात एका रात्रीत 32 पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ, एकूण आकडा झाला 548

0
293

गेल्या बारा तासात 32 पॉझिटिव्ह रुग्ण मिळून आले आहेत.

सोलापूर – सोलापूर येथे कोरोना झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी रात्री 28 ची वाढ झाल्यानंतर आज शनिवारी सकाळी ही कोरोना रिपोर्ट अहवाल धक्कादायकच आला आहे. काल सहा मृत्यू झाले होते मात्र सुदैवाने आज मृत्यूची नोंद नसली तरी कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

राञीतून 32 कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाल्याचा अहवाल प्रशासनाने माध्यमांना पाठविला आहे. ” त्यामुळे हा आकडा पाहता पाहता साडेपाचशेचा झाला आहे.

एकूण 135 जणांचा अहवाल असून त्यात 103 निगेटिव्ह तर 32 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात 21 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. 32 ची मोठी वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 548 वर पोचला आहे.

कालच्या अहवालामध्ये राञीतून आठ रुग्ण बरे झाल्याचे नमूद होते, माञ आजच्या अहवालात बरे होणा-या रुग्णांची नोंद शून्य आहे. माञ बाधितांचा आकडा 32 आला आहे.

आजचे तपासणी अहवाल -135
पॉझिटिव्ह- 32
(पुरुष- 21* स्त्री- 11)
निगेटिव्ह- 103
आजची मृत संख्या- 0
एकूण पॉझिटिव्ह- 548
एकूण निगेटिव्ह – 4781
एकूण चाचणी- 5329
एकूण मृत्यू-40
एकूण बरे रूग्ण- 224

Best IT Comany In Maharashtra , Solapur